भोपाळ- 'संस्कार व्हॅली स्कूल'मध्ये 'दी राउंड स्क्वेअर इंटरशनॅशनल कॉन्फ्ररन्स' आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट
आमिर खान हा 'शांती आणि सौहार्द'चे धडे देणार आहे. विशेष म्हणजे आमिरसोबत त्याचा धाकटा मुलगा आझाद राव खान हादेखील भोपाळमध्ये दाखल झाला आहे. कॉन्फरन्समध्ये 22 देशांमधील 375 प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
संस्कार व्हॅली स्कूलच्या कॅम्पसमध्ये आमिर याला पाहताच उपस्थित प्रतिनिधींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले. सगळ्यांनी हात उंचावरून आमिर खानला अभिवादन केले. आमिर यानेही हात दाखवून सगळ्यांचे अभिवादन स्वीकारले.
स्कूल फॅकल्टी आणि बाहेरुन आलेले डेलिगेट्सनी ग्रुप फोटो सेशननंतर सर्व शाळांनी फ्लॅग रॅलीही काढली. यानंतर प्रत्येक स्कूलच्या डेलिगेट्सने स्लाइड शो प्रेझेटेंशन सादर केले.
'जय हो.. आणि वंदेमातरम्.. हे गाणे गाऊन सर्व विद्यार्थ्यांनी आमिर खानचे कॉन्फ्ररन्स हॉलमध्ये स्वागत केले. दरम्यान आमिरने दीपप्रज्वलित करून कार्यक्रमाला औपचारिक सुरुवात झाली. नंतर विद्यार्थ्यांनी गणेश वंदना प्रस्तुत केले. उद्घाटनानंतर अन्य देशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी
आपापल्या शाळेचे प्रेझेंटेशन दिले.
आमिरवर डॉक्युमेंट्री...
गणेश वंदना झाल्यानंतर आमिर खानच्या एकूण व्यक्तीमत्त्वावर स्कूलद्वारा बनवण्यात आलेली डॉक्युमेंट्री यावेळी दाखवण्यात आली. यादरम्यान बॅकग्राउंडला 'सत्यमेव जयते'चे टायटल ट्रॅक प्ले करण्यात आले. नंतर आमिर खान याने त्याच्या बालपणीचा आठवणींना उजाळा दिला. तसेच करिअरबाबतही मार्गदर्शन केले.
5 कॉन्टिनेंट्स, 22 राष्ट्रे, 51 स्कूल्स, 375 डेलिगेट्स
संस्कार व्हॅली स्कूलमध्ये सुरु झालेल्या ‘द राउंड स्क्वेयर इंटरनॅशनल कॉन्फ्ररन्स-2014’मध्ये 5 कॉन्टिनेंट्सच्या 22 देशांमधील 51 स्कूल्सचे 375 डेलिगेट्स सहभागी झाले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात जगभरातून आलेल्या प्रतिनिधींचे पारंपरिक पद्धतीत स्वागत करण्यात आले. 3 ऑक्टोबरपर्यंत ही कॉन्फेरन्स चालणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आमिर खानला येताच जगभरातून आलेल्या प्रतिनिधींमध्ये निर्माण झाले नवचैतन्य...
फोटो- शान बहादुर और तन्मय जैन।