आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीपीडिताने संन्यास घेतला, मात्र जुन्या आरोपातून तुरुंगात गेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जावरा - पत्नीला मारहाण केल्याच्या जुन्या तक्रारीवरून एका तरुण साधूला पोलिसांनी बसस्थानकावर अटक केली. त्याच्यासाेबत गुरू बहीण साध्वीही होती. पोलिसांनी साधूची रवानगी तुरुंगात केली, तर साध्वीची मुक्तता केली.  
चौकशी केली असता, या दोघांनी गृहस्थाश्रम सोडून संन्यास घेतल्याचे उदाहरण समोर आले. त्यानंतर समजले की, महिलेने पतीच्या मारहाणीला कंटाळून घर सोडले होते, तर त्या तरुणाच्या विरोधात पत्नीने मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दिल्याने त्याने संन्यास घेतला.  जावरा येथील जबरन कॉलनीत राहणाऱ्या स्वप्ना जोशीने साध्वीची दीक्षा घेतल्यानंतर कृष्णानंद सरस्वती गिरी असे नाव धारण केले.
 
तिने सांगितले: ११ वर्षांपूर्वी जावरा येथे माझे लग्न सुनील शर्मा यांच्याशी झाले. नंतर आम्ही इंदूरला राहण्यास गेलो. तेथे पती खूप मारहाण आणि सतत छळ करायचा. त्यामुळे  चार वर्षांपूर्वी पहिला मुलगा अभय व मुलगी परी यांना सोडून घरातून बाहेर पडले. जावरा येथील सुनील जोशी जो आता साधू गंगेश्वर बनला आहे. त्याच्याशी स्वप्नाची ओळख होती.  त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा तो कोलकात्यात (हावडा) आहे असे समजले. तिने तेथे जाऊन साध्वीचे आयुष्य जगण्याचे ठरवले. संत भोलागिरीजी यांचा गुरुमंत्र घेतला. आता दोघेही गुरुबंधू-भगिनी झालो आहोत.
 
सिंहस्थाच्या वेळी बनेडी आश्रमात लालगिरी मातेच्या सान्निध्यात साध्वी संस्कार ग्रहण केले. त्यानंतर आम्ही भारतभ्रमण करण्यास निघालो. शनिवारी येथून जात असताना पोलिसांनी या साधूला पकडले. त्यांना सैलाना पोलिस ठाण्यात नेण्यात आले.  तेथे पोलिस ठाण्याचे प्रभारी  दिनेश वर्मा यांनी माझ्या आईवडिलांची चौकशी केली तेव्हा मुलांना भेटण्याची इच्छा झाली.  माझी आजी लीलाबाई जबरन कॉलनीत राहते. तेथे माझ्या ९ वर्षांच्या मुलास व ७ वर्षांच्या मुलीला भेटले. परंतु त्यांनी मला ओळखले नाही.  आईवडिलांनाही घरात घेण्यास नकार दिला. आता इंदूर आश्रमात जाईन आणि गुरुबंधू येतील तेव्हा वेगळा आश्रम स्थापन करून देवाची भक्ती करू, असे स्वप्ना जोशी यांनी सांगितले.  मामा व आईने मुलांना भेटण्याची परवानगी दिली आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, ती सोडून निघून गेली, त्यामुळे संन्यास घ्यावा वाटला
 
बातम्या आणखी आहेत...