आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारंगखेड्याची यात्रेत 21 लाखांत \'हीरा\' तर 15 लाखांत विकली \'चांदणी\'; वाचा 8 घोड्यांच्या किमती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडवानी/नंदुरबार- मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील खेतिया तालुका महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. एक नाला ओलांडल्यानंतर खेतियाचे लोक महाराष्ट्रात प्रवेश करतात. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याची यात्रा घोड्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. या यात्रेत घोड्यांची बोली लावली जाते. लाखों रुपयांत घोडे विकले जातात. महाराष्ट्र तसेच मध्यप्रदेशातील घोडे येथे विक्रीसाठी येतात.
सारंगखेड्याची यात्रा नुकतीच झाली. यात अनेक घोडे विक्रीसाठी उपलब्ध झाले होते. काही घोडे लक्झरी कारच्या किमतीपेक्षा जास्त किमतीत विकले गेले. 29 महिन्याचा 63 इंच उंच घोडा 'हीरा' 21 लाख रुपयांत खरेदी करण्यात आला.
मध्यप्रदेशातील खेतियापासून महाराष्ट्रातील सारंगखेडा हे अवघे 35 किलोमीटर अंतरावर आहे. बडवानी जिल्ह्यातील व्यापारी मोठ्या संख्येने महाराष्ट्रात जात येत असतात. बडवानीमधील घोडे देखील सारंगखेड्‍याच्या यात्रेत दाखल होतात.
यात्रा आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा घोड्यांची सर्वाधिक बोली लागली. तसव्वर मिर्झा यांचा 29 महिन्याचा आणि 63 इंच उंच घोडा 'हीरा'ला 21 लाख रुपयांची बोली लागली. तसेच 'चांदणी' नामक घोडी 15 लाख रुपयांत विकली गेली. या घोड्यांची किंमत अनेक लक्झरी कारच्या किमतीपेक्षा जास्त आहे. याशिवाय चेतक, ऐश्वर्या, बादल, राणी सारखे घोडे देखील 8 ते 15 लाख रुपयांत विक्री करण्‍यात आले.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, घोड्यांच्या किंमती आणि देखरेखीसाठी आलेला घोडे मालकांना खर्च...