आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sarpanch Repair Free Bicycle Of Student, News In Marathi

मुलांच्या सायकली मोफत दुरुस्त करणारे सरपंच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रतलाम (मध्य प्रदेश) - सरपंच अर्थात गावाचा प्रमुख. मध्य प्रदेशातील एक सरपंचाने शाळकरी मुलांच्या सेवेचे असेच एक व्रत घेतले आहे. ते मुलांच्या सायकली मोफत दुरुस्त करून देतात. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या कार्यालयात दैनंदिन कामे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा हा शिरस्ता बनला आहे.

रतलामपासून आठ किलाेमीटर अंतरावरील अमलेटा गावाचे सरपंच गोपाल खरे रोज सकाळी साडेनऊच्या सुमारास आपल्या दुकानात हजर होतात. तेथे साडेदहापर्यंत शालेय मुलांच्या सायकली दुरुस्त करण्याचे काम करतात. शाळेला सुटी असते त्या वेळी पुन्हा सायंकाळी चार वाजता दुकान सुरू करून सायकल दुरुस्त करून देतात. दररोज २५-३० मुलांच्या सायकली दुरुस्त करतात. अमलेटा गावातीलच नव्हे, तर पंचक्रोशीतील विद्यार्थीदेखील त्यांच्या दुकानावर मोफत दुरुस्तीसाठी सायकल घेऊन जातात. सायकल दुरुस्त झाल्याने मुलांना शाळेला जाण्याची चांगली सोय निर्माण होते. त्यातून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. म्हणूनच गोपाल यांना विद्यार्थ्यांविषयी आत्मीयता निर्माण झाली आहे.
प्रेरणा अशी मिळाली
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करतात, ही गोष्ट मला महत्त्वाची वाटली. सरकार मोफत सायकल वाटप करू शकत असेल तर मी त्यांची सेवा का करू शकत नाही, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सेवेचा संकल्प केला. शाळेत जाताना आणि येताना सायकल खराब होऊ नये, त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी दोन्ही वेळेला दुकान उघडतो. गेल्या पाच वर्षांपासून सुटी सोडल्यास दररोज ही सेवा देत आहे. सरपंच पदावर राहिलो किंवा नाही राहिलो तरी मोफत सायकल दुरुस्त करण्याचे काम करत राहणार आहे. मुलांशी माझे अतूट नाते निर्माण झाले आहे.