आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेणी कापणारा आढळला कीटक, शास्त्रज्ञांनी केला धक्कादायक खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरैनामध्ये एका महिलेला तिच्या केसांत हा किडा आढळला. - Divya Marathi
मुरैनामध्ये एका महिलेला तिच्या केसांत हा किडा आढळला.
ग्वाल्हेर - महिलांच्या वेणी कापण्याच्या घटना देशभरात उघडकीस येत आहेत. याच्याशी संबंधित अफवांना अक्षरश: ऊत आला आहे. यादरम्यान, मॅकी किड्याची अफवा निराधार सिद्ध झाल्यानंतर ग्वाल्हेरच्या मुरैनामध्ये एक विचित्र कीटक पकडण्यात आला आहे. पकडणाऱ्यांचा दावा आहे की, हा कीटक घरातील महिलेचे केस कापत होता. केस कापल्याची जाणीव झाल्याने महिलेने हात लावून पाहिले तर तिच्या हातात हा किडा आला आणि ती जोराने किंचाळली.
 
किड्याला पाहण्यासाठी झाली तोबा गर्दी, पकडणारी म्हणाली, हाच कापतोय केस
- मागच्या 2 महिन्यांपासून मुली आणि महिलांच्या वेणी कापण्याच्या घटना समोर येत आहेत. खेड्यापाड्यांपासून सुरू झालेल्या या घटनांचे लोण शहरी महिलांपर्यंत येऊन पोहोचले आहे.
- मागच्या मंगळवारीच मुरैनाच्या गणेशपुरामध्ये एका महिलेच्या वेणीला किडा कापत होता. महिलेने हाताने चाचपून पाहिले तर हा किडा तिच्या हातात आला. किड्याच्या पायाला अनेक केस लागलेले होते. यानंतर महिलेने तो किडा एका तरुणाच्या हातात दिला.
 
किड्याला आहेत नांगीसारखे अवयव, मानवी केस होते लपटलेले
 - लोकांनी पाहिले तर या किड्याला नांगीसारखे अवयव होते. त्यात पुष्कळ केस फसलेले होते. केस कापणारा किडा पकडल्याची माहिती मिळताच लोकांची तोबा गर्दी झाली होती आणि लोकांनी त्या किड्याला एका पारदर्शक डब्ब्यात कैद केले.
 
वैज्ञानिक म्हणतात...
 - वैज्ञानिक डॉ. विनायक तोमन म्हणाले की, कोलियोप्टेस प्रजातीचा हा किडा चारही बाजूंनी प्रोटेक्टिव्ह स्केलेटलच्या आवरणात सुरक्षित राहतो. याला माऊथपॅड आणि नागींसारखे अवयव असतात.
 - हा किडा प्रोटिनयुक्त मटेरियल खातो. मानवी केस हे केरेटिन प्रोटिनने बनलेले असतात. खाण्यासाठी हा किडा पॉड्सच्या माध्यमातून जिलेटिन मटेरियलला  टार्गेटवर टाकतो. यामुळे त्यावर एक पांढरी लेयर बनते, आणि तो भाग गळून वेगळा होतो.
 - डॉ. विनायक यांच्या मते, भारतीय महिला रात्री झोपण्याआधी केस मोकळे करतात, यामुळे जर हा इन्सेक्ट डोक्यातील केसांत शिरला तर याच्या पॉड्समुळे निघालेल्या जिलेटिनने केस तुटून वेगळे होऊ शकतात.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, Exclusive: मुरैनामध्ये पकडलेला हा किडा
बातम्या आणखी आहेत...