आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूल बसखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू, शाळा प्रशासनाने हायवेवर फेकला मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या चिमुकल्याचा या अपघातात मृत्यू झाला. त्याचे दप्तरही हायवेवर फेकून दिले. - Divya Marathi
या चिमुकल्याचा या अपघातात मृत्यू झाला. त्याचे दप्तरही हायवेवर फेकून दिले.
भोपाळ/राजगड (मध्य प्रदेश)- नरसिंहगड ब्लॉकमध्ये असलेल्या एका शाळेच्या आवारात चिमुकला खेळत होता. यावेळी रिव्हर्स येत असलेल्या स्कूल बसने चिमुकल्याला चिरडले. या अपघातात चिमुकल्याचा जागीच मृ्त्यू झाला. पण त्यानंतर शाळा प्रशासनाने जे काही केले ते प्रचंड संतापजनक आहे. या अपघाताची जबाबदारी झटकण्यासाठी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी चिमुकल्याचा मृतदेह हायवेवर फेकला. हायवेवर झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. ही माहिती शाळेच्या पालकांना मिळाल्यानंतर एकच गोंधळ उडाला. पालकांनी शाळेत येऊन मुख्याध्यापकाला जबर मारहाण केली. मुख्याध्यापकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पालकांनी पाठलाग करुन चांगलाच चोप दिला.
न बघता बस रिव्हर्स केल्याने अपघात
- रोहन झा असे मृ्त्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याचे वडील संजीत झा हिंद स्पिनर फॅक्टरीत काम करतात.
- एलकेजीत शिकणाऱ्या चिमुकल्याला बाईकवर शाळेत सोडून संजीत कंपनीत गेले होते.
- रोहनच्या मित्रांनी सांगितले, की आम्ही शाळेच्या मैदानात खेळत होतो. तेव्हा स्कूल बस जोरात मागे आली.
- स्कूलबसच्या मागच्या चाकाखाली रोहनचे डोके आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर इतर विद्यार्थी सैरावैरा पळाले.
- बस रिव्हर्स घेताना मागे न बघितल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.
- शाळेचे शिक्षक सुनील शर्मा यांनी रोहनला हातात घेतले. दुसऱ्या सहकाऱ्याची बाईक काढून त्याला शाळेबाहेर घेऊन गेले.
- याची माहिती संजीत यांना देण्यात आली. त्यानंतर संजीत यांच्यासह इतर पालक शाळेत दाखल झाले.
- पण शाळेत रोहन नव्हता. त्यानंतर त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
- संजीत यांनी आरोप केला आहे, की शाळेच्या प्रशासनाने रोहनचा मृतदेह हायवेवर फेकला होता. तेथून मी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.
- रोहनच्या मृत्यूने पालक चांगलेच संतापले. त्यांनी मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली.
पुढील स्लाईडवर बघा या घटनेचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...