आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • School Girl Rapd From 5 Months And Given Poison Pills Shocking Latest News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

5 महिन्यांपासून 7वीची विद्यार्थिनी सहन करत राहिली, शाळेत बेशुद्ध पडल्याने कळले हे सत्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित विद्यार्थिनीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. - Divya Marathi
पीडित विद्यार्थिनीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भोपाळ - 7व्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शनिवारी शाळेत विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. क्लासमध्ये पोहोचण्याआधीच ती चक्कर येऊन पडली. पण लगेच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस सूत्रांनुसार, शेजारी राहणारा फरजन खान तिच्यावर 5 महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता. शनिवारीही त्याने आपल्या दोन साथीदारांसह विद्यार्थिनीवर अत्याचार केला. यानंतर विद्यार्थिनीने विषारी औषध प्राशन केले. 

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- होशंगाबादेतील जुमेराती शासकीय माध्यमिक शाळेत 7व्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला आरोपीने त्याच्या 2 साथीदारांसह काली मंदिराजवळ बहाण्याने बोलावले होते. बीटीआय रोडवर झुडपांमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर विद्यार्थिनी 8 दिवसांनी शाळेत जात होती. शनिवारी आरोपीने बलात्कारानंतर विद्यार्थिनीला विषारी औषध दिले. एक गोळी त्याने बळजबरी खाऊ घातली, दुसरी गोळी विद्यार्थिनीने शाळेच्या परिसरात जाऊन खाल्ली.

 

असा झाला खुलासा...

शाळेचे हेडमास्तर एम. के. उईके म्हणाले की, शनिवारी विद्यार्थिनी 1 वाजता शाळेत पोहोचली. ती शाळेच्या मेनगेटमधून आता पोहोचताच बेशुद्ध झाली. मुलांच्या सांगण्यावरून जवळ जाऊन पाहिले तर विद्यार्थिनीच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. तिच्या हातात एक गोळीही होती. कुटुंबीयांना माहिती देऊन तिला लगेच 108 अॅम्ब्युलेन्समधून सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. कुटुंबीय म्हणाले, ती घरातून शाळेसाठी सकाळी 10.30 वाजता निघाली होती.

 

या आधीही खाल्ले होते विष
- विद्यार्थिनी भीतीमुळे तणावात होती. तिने 8 दिवसांपूर्वीही (18 नोव्हेंबर) विषारी औषध खाल्ले होते. सूत्रांनुसार, तेव्हाही मुलीवर लगातार दोन दिवसांपर्यंत अत्याचार करण्यात आला होता. भीतीमुळे तिने घरी कोणालाच काहीही सांगितलेले नव्हते.
- सरकारी रुग्णालयात पोलिस आणि नायब तहसीलदार विनोद पाठक आणि जबाब नोंदवले. विद्यार्थिनी म्हणाली, बलात्काराच्या आरोपींनी तिला विषारी गोळ्या दिल्या आणि बळजबरी खाऊही घातल्या. सोबत आणखी गोळ्या देऊन बाइकवरून शाळेत आणून सोडले. त्यांनी मुलीला सर्व गोळ्या खाण्याची धमकी दिली होती.

 

पॉक्सो अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल
- एसआय बालमुकुंद दुबे यांनी अल्पवयीन आरोपी, त्याचा साथीदार नौशाद आणि रुक्साना यांच्याविरुद्ध भादंविच्या 6 कलमान्वये आणि पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक झाली आहे.

 

तिन्ही आरोपी अटकेत
- पोलिस पथकाने नौगजा आणि बालागंज परिसरात छापे मारून तिन्ही आरोपींना जेरबंद केले. विद्यार्थिनीची प्रकृती आता स्थिर आहे. आरोपींची चौकशी करून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
- अरविंद सक्सेना, एसपी.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...