आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस सचिवाच्या गळ्यावर चाकू ठेवून गुुंडांची रेल्वेत लूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन | विदिशा येथील जिल्हा काँग्रेस सरचिटणीस महेश सोनी यांना धावत्या रेल्वेत गुंडानी लुटले. सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्या साेनीच्या गळ्यावर चाकू ठेवून एक गुंड त्यांच्याकडील सोन्याचे दागिने लुटून फरार झाला.
हे दागिने त्यांच्या पत्नीचे असून सोनी यांनी प्रवासादरम्यान ते खिशात ठेवले होते. नंतर हा गुंड मक्सीजवळ धावत्या रेल्वेतून उडी टाकून फरार झाला. या दागिन्यांची किंमत सुमारे ५० हजार इतकी आहे. मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील लटेरी गावात त्यांची दोन मुले इंदूरला शिकतात. पत्नी मुलांसोबत असते. त्यांना भेटण्यासाठी महेश सोनी आले होते. परत जाताना ही घटना घडली.
बातम्या आणखी आहेत...