आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेतील सीता मंदिराचा आराखडा तयार, अशोक वाटिकेत कैद होती सीता माता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - श्रीलंकेत नुवाराच्या अशोक वाटिकेत रावणाने सीतेला कैदेत ठेवले, त्याच जागेवर मध्य प्रदेश सरकारने सीता मंदिराचे काम सुरू केले आहे. बंगळुरूच्या आर्किटेक्ट, इंटिरिअर
डिझायनर सिकोस यांनी मंदिराचा नकाशा तयार केला.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव एस. के. मिश्रा सिकोस यांच्यासह श्रीलंकेत गेले आहेत. या दरम्यान ते बौद्धमठांचे संचालक आणि श्रीलंका पर्यटन मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

मंदिराच्या कामासाठी मध्य प्रदेश सरकारने आधीच एक कोटी रुपये दिले आहेत. कोलंबोपासून २१० किलोमीटर लांब नुवारापासून १५ किमी दूर असलेल्या या प्रस्तावित जागेचा ताबा सध्या बौद्ध मठाकडे आहे. त्यामुळे नकाशाला मंजुरी मिळाल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होणार आहे. मंदिर तयार झाल्यानंतर त्याची देखरेख मध्य प्रदेश सरकार करणार होते. मात्र, बौद्ध मठाने या मंदिराची देखरेख करण्यास तयारी दर्शवली आहे. त्या बदल्यात मध्य प्रदेश सरकार त्यांना दरवर्षी पैसे देणार आहे.

अशोक वाटिकेत घालवलेल्या वेळेची झलक : मंदिराचा नकाशा आणि आराखडा अशा पद्धतीने बनवण्यात आला आहे की, ज्यामध्ये वाटिकामध्ये सीता मातेने घालवलेल्या वेळेचे वर्णन असेल. या पूर्ण जागेची लँडस्केपिंग होईल. हे मंदिर १२.८ हेक्टरवर असेल. हे मंदिर तयार झाल्यानंतर मध्य प्रदेश सरकारचा पर्यटन विभाग या मंदिराचा पर्यटनाच्या दृष्टीने प्रचार आणि प्रसार करणार आहे.

२०१० मध्ये भूमिपूजन
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान २०१० मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते येथील सीता मंदिराचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी इंडिया फाउंडेशनचे संचालक चंदन मिश्रा आणि राम माधव उपस्थित होते.