आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Send My Hands Photos To School, 8 Years Kadir Said

माझ्या हाताचे फोटो प्राचार्य मॅडमना पाठवा, ८ वर्षीय कादीरचे उद‌्गार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - ‘मी शाळेत न येण्यासाठी बहाणा करत आहे, असे वाटू नये म्हणून माझ्या कापलेल्या हाताचा फोटो प्राचार्य मॅडमना पाठवा. हात तुटल्यामुळेच मी शाळेत येऊ शकत नाही,’ हे उद‌्गार आहेत आठ वर्षांच्या अब्दुल कादीरचे.
एका अपघातानंतर गेल्या वर्षी त्याचे दोन्ही हात कापावे लागले. कादीरचे वडील हुसेन इंदौरी यांनी सांगितले की शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा कादीरला शुद्ध आली तेव्हा आपल्याला हात नाहीत हे लक्षात आल्यानंतर कादीर कशी प्रतिक्रिया देईल याची काळजी सर्वांना होती.

पायात पेन धरून 15 मिनिटांत लिहितो पानभर
विजेचा धक्का लागल्याने अब्दुलचे दोन्ही हात जळाले होते. प्राण वाचवण्यासाठी हात कापावे लागले. जून २०१४ मध्ये मुंबईत शस्त्रक्रिया झाली. त्याला फक्त सात ते आठ महिने झाले आहेत. पण अभ्यासाबाबत त्याचा उत्साह कायम आहे. रतलाममध्ये सेंट जोसेफ शाळेत तो दुसरीला शिकतो.जिद्दीने अब्दुल आठ महिन्यांतच पायांनी लिहिण्यास शिकला. तो १५ मिनिटांत एक पान उर्दू लिहितो.

हवेत कृत्रिम हात
अब्दुलला कृत्रिम हात लावण्यासाठी १३ लाख रुपये खर्च येतो. मध्य प्रदेशचे मुख्य सचिव अँटोनी डिसा यांच्याकडे मदत मागण्यात आली. त्यांनी सरकारी खर्चाने कृत्रिम हात बसवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

वीज तार पकडली
कादीर गेल्या वर्षी २० मे रोजी भोपाळच्या हाउसिंग बोर्ड कॉलनीत नातेवाइकाकडे आला होता. छतावर खेळताना त्याने तेथून जाणारी उच्च दाबाची वीज तार पकडली. त्यामुळे त्याचे दोन्ही हात भाजले होते.
पुढील स्‍लाईडवर पाहा अब्दुल कादीरची आणखी काही फोटो...