आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भय्यू महाराज पुन्हा विवाह करणार; डाॅ. अायुषी यांच्याशी 30 एप्रिलला विवाहबद्ध हाेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- भय्यू महाराज ३० एप्रिल रोजी मुरैनाच्या शर्मा कुटुंबातील डॉ. आयुुषीसोबत इंदूरच्या सिल्व्हर स्प्रिंग क्लबमध्ये विवाहबद्ध हाेतील. वर्षभरापूर्वीच भय्यू महाराजांच्या पहिल्या पत्नी माधवी यांचे निधन झाले होते. ८५ वर्षीय अाई कुमुदिनी देशमुख व १५ वर्षीय मुलगी कुहू यांची काळजी घेण्यासाठी विवाह करत असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरापूर्वी त्यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती पत्करली हाेती. सद््गुरू दत्त धार्मिक ट्रस्ट नामक आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक, सामाजिक कार्य केले आहे.  या आश्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासह अनेक प्रतिष्ठित लोकांनी भेट दिली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...