आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातवर्षीय मोहिनीवर वर्षभरात तब्बल १८ शस्त्रक्रिया, अपघातानंतर प्रथमच उभा राहून वाढदिवस साजरा केला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सातवर्षीय मोहिनी शर्मा वर्षभरापूर्वी ३ नोव्हेंबर रोजी शाळेतून परतत होती. मिनी ट्रकने धडक दिल्याने तिचा उजवा पाय चिरडला गेला. नर्मदा रुग्णालयात १८ शस्त्रक्रिया झाल्या. एक वर्षानंतर १२ नोव्हेंबर रोजी प्रथमच ती स्वत:च्या पायावर उभी राहिली. याच दिवशी तिचा वाढदिवस होता.

गुडघा पूर्णपणे चिरडला गेला होता. त्यामुळे तो काढावा लागला. पाय दुमडता येत नाही. मात्र, ही मुलगी धैर्यवान सिद्ध झाली. तिने हळूहळू उभे राहण्याचा प्रयत्न केला. आता ती चालू शकते. मोहिनीवर उपचार करणारे नर्मदा रुग्णालयाचे संचालक आणि आॅर्थोपेडिक सर्जन डॉ. राजेश शर्मा यांनी सांगितले की , मोहिनीच्या उजव्या पायाच्या चिरडल्या गेलेल्या रक्तवाहिनीला शस्त्रक्रियेदरम्यान ग्राफ्ट लावून ठीक करण्यात आले. ज्या नसा पूर्णत: निकामी झाल्या त्या काढून टाकल्या. रक्तातून संसर्ग होऊ नये यासाठी असे केले. मोहिनीची आई रश्मी शर्मा यांनी सांगितले की, कमला देवी पब्लिक स्कूलने तिला विशेष विद्यार्थी मानले आहे. मुलीचे दुसऱ्या इयत्तेतील शिक्षण थांबू नये यासाठी एक शिक्षिका तिला घरी येऊन दोन तास शिकवते. त्यामुळे ती इतर मुलांच्या बरोबरीने शिक्षण घेऊ शकते.

१४ लाख खर्च, १० लाख सरकारने, तर ४ लाख रुग्णालयाने दिले : मुलीचे वडील ब्रह्माशंकर शर्मा आणि आई रश्मी यांनी सांगितले की, मोहिनीच्या उपचारासाठी एकूण १४ लाख रुपये खर्च झाले. १० लाख सरकारने, तर ४ लाख रुपये रुग्णालय व्यवस्थापनाने खर्च केले.

पूर्णपणे बरे होण्यास आणखी तीन महिने
प्लास्टिक सर्जन डॉ. एच. एस. बिसोनिया यांनी सांगितले की, मोहिनीला पूर्णत: बरे होण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा अवधी लागेल. तिचा उजवा पाय डाव्या पायाच्या तुलनेत बारीक आहे. दोन महिन्यांत जाडी समान होईल.
बातम्या आणखी आहेत...