आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारच्या बॅक सीटवर अश्लील चाळे करत होता कपल, मिररमध्ये पाहून ड्रायव्हरने केले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारमध्ये मागच्या सीटवर बसलेले कपल अश्लील चाळे करत होते. - Divya Marathi
कारमध्ये मागच्या सीटवर बसलेले कपल अश्लील चाळे करत होते.
भोपाळ - मध्य प्रदेशच्या राजधानीतील पॉश परिसरात एक भरधाव कार डिव्हायडरला जाऊन धडकली. अपघात झालेल्या कारमध्ये 3 जण होते. त्यामध्ये ड्रायव्हर आणि मागे बसलेल्या एका मुलाचा व मुलीचा समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, मागच्या सीटवर बसलेला युवक आणि तरुणी दारुच्या नशेत अश्लील चाळे करत होते. ड्रायव्हर हा प्रकार आपल्यावरच्या आरशातून पाहत होता. त्याचवेळी चालकाचा ताबा सुटला...
 

अर्धनग्न अवस्थेत अश्लील चाळे करत होते
- शहरातील एमपी नगर परिसरात शनिवारी एक भरधाव कार दुभाजकाला जाऊन आदळली. अपघात घडताच ड्रायव्हर उतरला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा स्थानिकांनी त्याला पकडले.
- यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, कारच्या मागच्या सीटवर एक युवक आणि त्याची मैत्रीण अर्धनग्न अवस्थेत अश्लील चाळे करत होते. 
- अपघात घडताच मुलीने आपले कपडे सावरले आणि घटनास्थळावरून पळ काढला. तर दारुच्या नशेत धुंद असलेला युवकाने सुद्धा आपला चेहरा लपवून झटपट कपडे घातले. 
 

कारमध्ये सुद्धा पीत होते
- जमावापैकी काहींनी विचारल्याने ड्रायव्हरने हकीगत मांडली. त्याच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या कपलने ती गाडी बुक केली होती. त्याच्यासोबत एक मुलगी सुद्धा होती. दोघांनी कारमध्ये बसण्यापूर्वी खूप ड्रिंक केले. कारमध्ये बसल्यानंतरही ते पीत होते. त्यांनी ड्रायव्हरला शहर फिरवून दाखवण्यास सांगितले होते. 
- एमपी नगर परिसरात आलेल्या या कपलला ड्रायव्हर चोर नजरेने आपल्यावरच्या मिररमधून पाहत होता. ते दोघे केवळ दारूच पीत नव्हते, तर मागच्या सीटवर अर्धनग्न अवस्थेत अश्लील चाळे सुद्धा करत होते. तेवढ्यात चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि कार डिव्हायडरला जाऊन भिडली. 
 

कपल पोलिसांच्या हवाली
- जमलेल्या लोकांपैकीच एकाने 100 क्रमांक डायल करून पोलिसांना बोलावले. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मागच्या सीटवरच बसलेल्या युवकाला ताब्यात घेतले. 
- तर, घटनास्थळावरून पसार झालेल्या मुलीचा पाठलाग करत तिला देखील जवळच्याच एका पार्कमध्ये पकडले. 
- पोलिसांनी कारमध्ये सापडलेल्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या असून युवक आणि युवतीला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...