आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकालेश्वर नगरीत एस्कॉर्ट्सच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- महाकालेश्वर नगरी अर्थात उज्जैनमध्येे एस्काटर्स सर्व्हिसच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. इंटरनेटवर अशा हजारों वेबसाइट्स आहेत की, त्यावर एस्कार्ट्सच्या नावाखाली खुलेआम वेश्या व्यवसाय चालत असल्याचे पोलिस सांगितले.
दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरात शुल्लक वाटत असलेला एस्कॉर्ट्स सर्व्हिसचा बिझनेस आता छोट्या शहरात झपाट्याने विस्तारित झाला आहे.

इंदूर, जबलपूर सारख्या शहरात असा चालतो गोरखधंदा...
- पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उज्जैनमध्ये एस्कार्ट्स सर्व्हिसच्या नावाखाली खुलेआम देहविक्री सुरु होती. खबर्‍याने दिलेल्या गोपनिय माहितीच्या आधारावर अॅडीशनल एसपी अमरेन्द्र सिंह यांनी सापळा रचून एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.
- इंटरनेटद्वारा सुरु झालेला हा गोरखधंदा केवळ उज्जैन शहरातच नव्हे तर देशातील छोट्‍या-मोठ्या शहरात देखील खुलेआम सुरु आहे. या कामात वेबसाइट्ससोबतच फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर केला जात आहे.
- काही महिन्यांपूर्वी मुंबई, दिल्ली, चंदीगडमध्ये काही ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करून सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला होता.
- इंदूरमध्ये सत्ताधारी भाजपच्या एका खासदाराच्या स्वीय साहाय्यकाला अड्डयावर रंगेहाथ अटक केले होते. यूपीतील एका खासदाराच्या मुलाची एस्कार्ट्सच्या नावाखाली मुंबईत गंडवल्याचे प्रकरण समोर आले होते.

या प्रकरणी अनभिज्ञ आहे पोलिस...
- अॅडिशनल एसपी (गुन्हे शाखा) विनय प्रकाश पॉल यांनी सांगितले की, ऑनलाइन सेक्स रॅकेटबाबत एकही तक्रार मिळाली नाही. काही लोक संघटीत होऊ अशा वेबसाइट चालवत असतील तर, हे प्रकरण आयटीईएशी संबंधित आहे. पोलिस चौकशी करून योग्य ती कारवाई करेल.

पुढील स्लाइड्सवर वाचा, एस्कॉर्ट्सच्या नावाखाली चालत होते सेक्स रॅकेट संबंधित धक्कादायक माहिती...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...