आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायप्रोफाइल सेक्स रॅकेट: दिग्गज मंत्र्याचा मुलगा बोलावत होता \'कॉल गर्ल\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- टीव्ही कलाकार विश्वभंर बुधौलिया यांच्या घरात झालेल्या चोरीप्रकरणी पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. शुभम असे आरोपीचे नाव असून तो दुसरा तिसरा कोणी नसून मध्य प्रदेशातील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा म्होरक्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुभम राज्यातील एका मंत्र्याच्या पुत्राला कॉल गर्ल पुरवत होता. पोलिसांनी जप्त केलेल्या लॅपटॉपमध्ये पोलिसांना कॉल गर्लचा डाटा मिळाला आहे. विशेष म्हणजे शुभमला हा लॅपटॉप एका पोलिस अधिकार्‍याने गिफ्ट दिला आहे.
श्यामला हिल्स पोलिसांनी शुभमसह त्याच्या दोन साथीदारांचा मुसक्या आवळल्या आहे. गुड्डू कुशवाह आणि देवेंद्र असे शुभमच्या साथीदारांची नावे आहेत. तिघांवर टीव्ही कलाकार विश्वभंर बुधौलिया यांच्या घरात चोरी केल्याचा आरोप आहे. शुभमच्या लॅपटॉपमध्ये धक्कादायक माहिली समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर शुभमचा भूतकाळ पोलिसांनी उकरुन काढला आहे.
सागर जिल्ह्यात नेटवर्क...
शुभम एक वर्षापूर्वी मध्य प्रदेशातील बहुतांश हायप्रोफाइल पर्सनालिटीजला कॉल गर्ल पुरवत होता. शुभमचे संपूर्ण सागर जिल्ह्यात नेटवर्क होते. शुभमच्या हायप्रोफाइल पर्सनालिटीच्या लिस्टमध्ये मध्य प्रदेशसह दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि गुजरातमधील कॉल गर्ल्सचा समावेश आहे. टीव्ही तसेच फॅशन जगातील काही मॉडेल्सही शुभमच्या संपर्कात होत्या. शुभम सेक्स रॅकेटशिवाय चोर्‍यामार्‍याही करत होता. सागर जिल्ह्यातील बंडा येथे शुभमने एका व्यक्तिकडे कॉल गर्ल पाठवली होती. मात्र, शुभमला यात पूर्ण मोबदला मिळाला नाही. त्यामुळे शुभमने पहिल्याचा त्याच व्यक्तिच्या घरातील पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, भिक्षुकी करता-करता बनला कॉल गर्ल्स सप्लाय...