आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालसुधार गृहात \'सेक्स स्कॅंडल\'; मुली म्हणाल्या, चोर पावलांनी यायचे रितेश सर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पीडित मुली आणि  इन्सेटमध्ये आरोपी रितेश - Divya Marathi
वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पीडित मुली आणि इन्सेटमध्ये आरोपी रितेश
उज्जैन- महाकालेश्वर नगरी म्हणून प्रसिद्ध असणार्‍या उज्जैन येथे मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील 'आंगण' बालसुधार गृहातील सेक्स स्कॅंडलचा भांडाफोड झाला आहे. आरोपी दुसरा तिसरा कुणी नसून बालसुधार गृहाचा संचालक रितेश क्षत्रिय हा आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.
दुसरीकडे, पीडित मुलींना महिला सशक्तीकरण पथकांच्या देखरेखीत ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाने निर्देश दिले आहेत. आरोपीला कोर्टाने एक दिवसांची पो‍लिस कोठडी सुनावली आहे.

मिळालेली माहिती अशी की, उज्जैनमधील बुधवारिया भागातील आंगन बालसुधार गृहात तीन अल्पवयीन मुलींनी बुधवारी पोलिसांत संचालक रितेश क्षत्रिय याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या बालसुधार गृहात एकूण 37 मुली राहातात. रितेश मागील काही महिन्यांपासून मुलींचे लैंगिक शोषण करत होता. मुलींना अश्लील सिनेमे दाखवून त्यांच्यावर अत्याचारही करायचा. मुलींच्या अंगावरील कपडे उतरवायचा. विरोध केल्यास त्यांचा कपडे फाडायचा, असे पीडित मुलींना आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
मुलींच्या तक्रारीची गंभीर दखल घेवून पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपी रितेशच्या मुसक्या आवळल्या. मुलींची वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. बाल सुधारगृहाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच महिला व बाल विभागाचे कार्यालय असल्याने या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

चोर पावलांनी यांचा आरोपी...
आरोपी रितेश मुलींच्या खोलीत चोर पावलांनी प्रवेश करायचा मुलींच्या अंगावरील कपडेही उतरवत होता. आरोपीला या कामात बालगृहातील दोन महिला कर्मचारी मदत करत होत्या, अशी धक्कादायक माहिती पीडित मुलींनी पोलिसांना सांगितली आहे.

स्वयंपाक खोलीत दुष्कर्म करायचा आरोपी
बालसुधार गृहाच्या स्वयंपाक खोलीत आरोपी रितेश मुलींसोबत दुष्कर्म करत असल्याची माहिती समोर आली आहे. आसाममधील एका मुलीने सांगितले की, तिने एके दिवशी जेवण केले नव्हते. जेवण देण्याच्या बहाण्याने आरोपी तिला स्वयंपाक खोलीत घेऊन गेला. दार आतून बंद केले आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला.

एका पीडितेने सांगितले की, आरोपी त्यांना नातेवाइकांनी भेटू देत नव्हता. नातेवाइकांशी भेटले तर भोपाळ येथे ट्रान्सफर करेल, अशी धमकीही तो द्यायचा.

आरोपीच्या जाचाला कंटाळून पळून गेल्या मुली
आरोपीकडून होणार्‍या लैंगिक शोषणाला कंटाळून अर्धा डझन मुली बालसुधार गृहातून पळून गेल्याचे एका पीडितेने सांग‍ितले.

आरोपीसह बालसुधार गृहातील कर्मचार्‍यांनी आमच्यावर दबाव टाकत असल्याचे मुलींने पोलिसांना सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...