आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपतींपासून पंतप्रधानांपर्यंत झुकले येथे, प्रसिद्ध केले वादग्रस्त पोस्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वतींनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे. त्यानंतर साईभक्तांचा राग उफाळून आला होता. या निमीत्ताने divyamarathi.com शंकराचार्यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमागची कथा सांगत आहे.
भोपाळ - शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या दरबारात राष्ट्रपतींपासून सर्वच दिग्गज वेळोवेळी हजेरी लावत आले आहेत. त्यांचा आशीर्वाद घेणाऱ्यांच्या यादीत अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी देखिल आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंहांचे तर ते गुरु आहेत. स्वामी स्वरुपानंदाचा आशीर्वाद बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांना देखिल मिळालेला आहे.

शंकराचार्यांनी जवळपास एक वर्ष किंवा त्याही आधीपासून शिर्डीच्या साईबाबांविरोधात मोहिम उघडली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सुरु झालेली ही मोहिम बिहार विधानसभेदरम्यान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. साईबाबांनी इहलोकीचा निरोप घेऊन 97 वर्षे झाली आहेत. मात्र जसजसा काळ चालला आहे तसतसे साईंच्या भक्तांमध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत चालली आहे.

महाराष्ट्रातील एका भक्ताला पडले स्वप्न
गेल्या आठवड्यात शंकराचार्य स्वामी स्वरुपानंदांनी भोपाळमध्ये एक पोस्टर प्रकाशित केले, ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. या पोस्टरमध्ये पवनपुत्र हनुमान यांनी एक भलेमोठे वृक्ष खांद्यावर घेतलेले आहे आणि ते साईबाबांना मारण्यासाठी धावत आहेत. तर, साईबाबा जीव वाचवत पळत आहे, असे या पोस्टरमधून दाखवण्यात आले आहे. शंकराचार्यांनी या पोस्टरमागची कथाही सांगितली. त्यांच्या म्हणण्यानूसार, महाराष्ट्रातील एका भक्ताला स्वप्न पडले की, साईचा मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर ते अनेकांना त्रास देत आहेत. म्हणून हनुमान त्यांना पळवून लावत आहे. भक्ताच्या या स्वप्नावरुनच हे पोस्टर बनवण्यात आल्याचे शंकराचार्यांनी सांगितले होते. या मुद्यावर शंकराचार्यांनी धर्मसंसदेचीही आयोजन केले होते. त्यांचे म्हणणे आहे, की आमचे म्हणणे लोकांना आता समजायला लागले आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय लिहिले पोस्टरवर
बातम्या आणखी आहेत...