आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पू मर्डरमध्ये नवा खुलासा: तीन जणांसोबत होती ही तरुणी, बळजबरीने उतरवले गेले होते कपडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - शिल्पू भदौरिया मृत्यू प्रकरण आता एक मिस्ट्री म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. पोलिस शिल्पूचा मृत्यू आत्महत्या ठरवण्याच्या मागे लागले आहेत, तर इंडियन आर्मीमधील तिचे वडील मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः पुरावे गोळा करायला लागले आहेत. गेल्या महिन्यात इंदूर येथील लेमन ट्री हॉटेलच्या 4 थ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झालेल्या शिल्पूच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी असे पुरावे शोधून काढले आहेत जे ही हत्या असल्याचे स्पष्टपणे दर्शवत आहेत.
असे मिळवले पुरावे
- 7 ऑगस्ट रोजी शिल्पू व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी हॉटेल लेमन ट्री येथे गेली होती. त्याच हॉटलच्या चौथ्या मजल्यावरुन पडून तिचा मृत्यू झाला.
- तिचे वडील रमेश भदौरिया यांचे म्हणणे आहे, की पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरही पोलिस ती आत्महत्याच होती हे बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
- एवढेच नाही, भदौरिया यांचा आरोप आहे की आरोपी नीरज दंडौतिया ग्वाल्हेर मधील त्याच्या राजकीय ओळखीने पोलिसांवर दबाव टाकत आहे.
- त्यामुळे भदौरिया स्वतः या प्रकरणात पुरावे गोळा करत आहेत. एक-दोन दिवसांमध्ये शिल्पूचा व्हिसेरा रिपोर्ट येईल, त्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वडिलांनी नवे पुरावे पोलिसांना दिले
- पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार शिल्पूच्या बॉडीवर बळजबरी दरम्यान आरोपींच्या नखांचे ओरखडे आढळून आले.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिचा मृत्यू गॅलरीतून पडण्याआधी श्वास रोखल्याने झाला होता.
- PM रिपोर्टनुसार शिल्पूची पाठ आणि छातीवर दाबल्याच्या खूणा आढळून आल्या. असे वाटते की हात किंवा उशीने दाबून तिचा श्वास रोखण्यात आला.
- PM रिपोर्टनुसार शिल्पूचे अंडरगारमेंट्स बळजबरीने कमरेखाली ओढण्यात आले होते. त्यामुळे शंका आहे की तिच्यासोबत जबरदस्ती झाली होती.
- दुसरीकडे पोलिसांना हॉटेल रुममधून दोन जेंट्स अंटरवेअर आणि कंडोम सापडले होते, मात्र आतापर्यंत त्यांनी याचा चौकशी प्रक्रियेत समावेश केलेला नाही.
- घटना घडली तेव्हा हॉटेलच्या रुममध्ये आणखी एक मुलगी आली होती, पोलिसांनी तिचा जबाबही चौकशीत सहभागी करुन घेतलेला नाही.
लष्करातील पित्याने केली नखांच्या DNA टेस्टची मागणी
- रमेश भदौरिया यांनी मागणी केली आहे की आरोपींच्या नखांची फॉरेन्सिक टेस्ट आणि DNA टेस्ट केली जावी. शिल्पूच्या बॉडीवर आढळलेले नखांचे ओरखडे, यांच्यासोबत ते जुळतात का याची चौकशी झाली पाहिजे.
- घटनास्थळी असलेले टिश्यू पेपर, गादी, उशीवर लागलेले रक्ताचे डाग, नॅपकिन यांचा देखील तपास कार्यात समावेश केलेला नाही. वास्तविक हत्येचे ही प्रमुख पुरावे आहेत.
- शिल्पूच्या शरीरावर धारदार शस्त्राचेही निशाण सापडलेले आहे, त्या दिशेनेही तपास होण्याची गरज भदौरिया यांनी व्यक्त केली.
- हॉटेलमधील रुममध्ये हॉटेल बाहेरील जेवणाच्या ऑर्डरचे एक जुने बील सापडले आहे. तर, हॉटेल मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की त्याच दिवशी जेवण ऑर्डर करण्यात आले होते.
- याशिवाय CCTV फुटेजमध्ये एक टॅटू असलेला मुलगा आत येतो आणि बरोबर शिल्पूच्या मृत्यू्च्या आधी तो रुममधून बाहेर पडतो. हा पुरावातर पोलिसांनी प्राथमिक तपासातच बाजूला केला आहे.
पोलिस म्हणतात- तपास योग्य दिशेने
- या प्रकरणाबाबत इंदूरचे DIG संतोष सिंह यांचा दावा आहे, की PM रिपोर्ट आणि नव्या पुराव्यांच्या आधारावर तपासाचे कार्यक्षेत्र वाढविण्यात आले आहे.
- यानंतरही रमेश भदौरिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की FIR मध्ये PM रिपोर्टमध्ये समोर आलेल्या बलात्कार आणि खूनाचा प्रयत्न यानुसार कलम लावण्यात आलेले नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, वडिलांनी गोळा केलेले पुरावे जे अजून चौकशीत आले नाही...
बातम्या आणखी आहेत...