आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंकराचे मंदिर मध्य प्रदेशामध्ये, नंदी महाराष्ट्राच्या रोमिंग कक्षेत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडवानी (मध्य प्रदेश)- मध्यप्रदेशच्या बडवानी जिल्ह्याच्या हद्दीतील राजवाडा फलिया येथील मालकातर गावात हनुमान मंदिराच्या समोरील जागेत शिवलिंग नंदीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दोन्ही मूर्तींच्या मधील अंतर केवळ दोन पावलांचे आहे; पण शिवलिंग मध्य प्रदेश, तर नंदी महाराष्ट्राच्या रोमिंगच्या कक्षेत येतो. येथे भक्तगण बोलता बोलता कधी रोमिंगच्या कक्षेत येतात, हे कळत नाही. रोमिंग चार्जेस कट झाल्यावर ते लक्षात येते. मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवर हे मंदिर असल्याने भक्तांना नेहमी हा अनुभव येतो.
राजवाडा फलिया गावाचे पंचायत क्षेत्र ७५ % महाराष्ट्रात तर २५ % मध्य प्रदेशच्या सीमेत येत असल्याचे सरपंच छतरसिंह पटेल यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या सीमेवरील मालकातर गाव शिरपूर तहसील, धुळे जिल्ह्यांतर्गत येते. २५% दोंदवाडा ग्रामपंचायत क्षेत्र पानसेलम तहसील मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात येते. येथे या क्षेत्राला राजवाडा म्हणून आेळखले जाते. गावातील ज्येष्ठांच्या मते हे मंदिर बरेच जुने आहे. याच्या स्थापनेच्या वेळी राज्यांच्या सीमा निश्चित झालेल्या नव्हत्या. मात्र कालांतराने हे मंदिर दोन राज्यांच्या सीमाक्षेत्रात विभाजित झाले. शिवलिंगाच्या अगदी मागे मध्य प्रदेशच्या सीमेत हनुमानाचे मंदिर आहे.

महाराष्ट्राकडून मंदिरापर्यंत रस्ते बांधणी
महाराष्ट्राच्याहद्दीतील गावांत २०० ते २५० घरे असल्याचे सरपंच छतरसिंह पटेल यांनी सांगितले. मप्रच्या सीमेत एकूण ५० ते ६० घरे आहेत. महाराष्ट्र शासनाने मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. मप्रच्या हद्दीतील रस्ते अद्याप कच्चे आहेत.