आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोपाळ- भारतीय जनता पक्षाचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तिस-यांदा शपथ घेतली. 'भेल'च्या जंबूरी मैदानावर आयोजित भव्य समारंभात त्यांचा शपथविधी झाला. मैदानावर भव्य व्यासपीठ बनविण्यात आले होते. त्याची विभागणी करण्यात आली होती. त्यांना वेगवेगळ्या डोमचा आकार देण्यात आला होता. मुख्य व्यासपीठावर व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपींसह 220 जणांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती. भाजपचे दिग्गज नेते कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु, पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची गळाभेट लक्षवेधक ठरली. अडवाणी यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या.
राज्यपाल रामनरेश यादव यांनी शपथ दिली. शपथ घेतल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी जनतेचे आभार मानले. जनतेने ठेवलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.