आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सिंहस्थ कुंभमेळ्यातून जगात आध्यात्मिक संदेश जावा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्या माध्यमातून जगभरात आध्यात्मिक संदेश पोहोचावा. त्याचबरोबर पर्यावरणपूरक आणि मूल्याधारित जीवनशैलीचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केली आहे.

जागतिक समुदायामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक संदेश पोहोचवण्याबरोबरच मूल्याधारित जीवनशैलीचा प्रसार करण्यासाठी कुंभमेळ्याचे व्यासपीठ महत्त्वाचे ठरणार आहे. एवढेच नव्हे, तर महिला सशक्तीकरण, धार्मिक शिकवण आणि सामंजस्य या गोष्टींचाही प्रचार व्हावा, यासाठी कुंभमेळा महत्त्वाचा ठरणार आहे, असे चौहान म्हणाले.