आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियात व्हायरल झाले CM शिवराजसिंह चौहाणांचे हे Photo, लोकांनी उडवली खिल्ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - पावसाने राज्यात दाणादाण उडवून दिल्यानंतर रविवारी पाहाणी दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांचे पाण्यात पाय ओले होतील, कपडे खराब होतील म्हणून पोलिसांनी त्यांना असे उचलून घेतले होते. हा फोटो सोशल मीडियावर शेअर झाला तेव्हा लोकांनी राग आणि संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांना पाय ओले होऊ नये याची चिंता असल्याबद्दल लोकांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला आणि खिल्ली उडवली. 
 
CM चौहान यांच्या अशा वर्तणूकीवर विरोधकांनीही निशाणा साधला. जर मुख्यमंत्र्यांना पाय ओले होण्याची एवढी चिंता वाटत असेल तर त्यांना पाण्यात घर-दार बुडालेल्या लोकांचे दुःख काय कळणार असा आरोप होत आहे. 
 
असाच कारनामा महाराष्ट्रातही झाला होता.. 
असाच काहीसा कारनामा महाराष्ट्रातही झाला होता. योगायोग असा की त्या मंत्रीही भाजपच्या होत्या. पंकजा मुंडे दुष्काळ दौऱ्यावर गेल्या तेव्हा त्यांची चप्पल चिखलात भरू नये म्हणून एका व्यक्ती त्यांची चप्पल हातात घेऊन चालत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 
 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सोशल मीडियातून आलेल्या प्रतिक्रिया.. 
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...