आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबाराआधी 7 तास तिसऱ्याच सोबत होती सृष्टी, व्हिडिओतून उलगडणार भूतकाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत सृष्टीच्या खूनाची बातमी कळाल्यानंतर तिच्या आई-वडिलांसह बहिण ओक्साबोक्सी रडले - Divya Marathi
मृत सृष्टीच्या खूनाची बातमी कळाल्यानंतर तिच्या आई-वडिलांसह बहिण ओक्साबोक्सी रडले
पाटणा/इंदूर - मध्यप्रदेशातील इंदूरमधील सृष्टी जैनवर (23) बिहारमधील पाटण्यात चालत्या ऑटोमध्ये प्रियकराकडून गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारात ठार झालेल्या सृष्टी खून प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. प्रियकर रजनीश आणि त्याचा मित्र राहुल यांच्याशिवाय आणखी एक व्यक्ती सृष्टीला पाटण्यात भेटली असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
तपासात समोर आले की मृत सृष्टी आणि आरोपी समजल्या जाणाऱ्या रजनीश यांच्यासोबत आणखी एक कॅरेक्टर सात तास त्यांच्यामध्ये होते. सृष्टी खून प्रकरणाशी या तिसऱ्या कॅरेक्टरचा थेट संबंध असण्याची पोलिसांना दाट शंका आहे.

कोण आहे ते सात तासांचे कॅरेक्टर
पोलिस तपासात समोर आले की मनी इंटरनॅशन हॉटेलमध्ये 12 जानेवारी रोजी थांबलेल्या सुरेश रेड्डीसोबत सृष्टीने रविवारी सात तास घालवले होते. दोघे हॉटेलमधून सोबत बाहेर पडले, शॉपिंग केली, चित्रपट पाहिला आणि उशिरा रात्री हॉटेलमध्ये परतले. हा या मर्डर केसमधली पहिला धक्कादायक खुलासा. असे अनेक खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. दुसरा अँगल सृष्टीच्या मोबाइलमधील मेमरी कार्डशी संबंधित आहे. या कार्डमध्ये असे व्हिडिओ सापडले आहे, ज्यामधून पोलिस आता सृष्टीच्या भूतकाळात डोकावण्याचा प्रयत्न करत आहे.

... तर काय विवाहित होती सृष्टी
व्हिडिओमधून असे दिसते की सृष्टी विवाहित होती आणि तिचे अनेक लोकांसोबत 'चांगले संबंध' होते. या खून प्रकरणाचा तिसरा एक अँगल आहे, तो आहे की ती दिल्लीतील एका डॉक्टरकडे काम करत होती. रजनीशच्या किडनी ट्रान्सप्लांटमध्ये सृष्टीने त्याला काही मदत तर केली नव्हती ? याचाही पोलिस शोध घेत आहेत. अखेर सत्य काय आहे, हे समोर येईलच मात्र ते आश्चर्यचकित करणारे असणार हे नक्की.

पोलिस काय म्हणाले
एसएसपी मनु महाराज म्हणाले, रजनीश आणि राहुल ताब्यात आल्यानंतर या खून प्रकरणाचा उलगडा होईल. पोलिस सध्या सृष्टीचा भूतकाळ तपासत आहे. काही नवीन माहिती समोर आली आहे, त्याचा तपास सुरु आहे. रजनीश आणि राहुल ताब्यात आल्यानंतर या प्रकरणावरुन पडदा उठेल. पोलिस तपास योग्य दिशेने सुरु आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
>> कोणासोबत हॉटेलच्या रुममधून बाहेर पडली होती सृष्टी
>> तिच्या मेमरी कार्डमध्ये कसे व्हिडिओ सापडले