आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला SI ने मागितली लाच, 2 हजार देतो म्हटले तर म्हणाल्या - ही काय भाजीमंडी आहे !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच हजरांची लाच मागण्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आलेली पोलिस उनिरीक्षक सुरुचि शिवहरे - फाइल फोटो - Divya Marathi
पाच हजरांची लाच मागण्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आलेली पोलिस उनिरीक्षक सुरुचि शिवहरे - फाइल फोटो
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) - पोलिस हे जनतेचे रक्षक समजले जातात मात्र जेव्हा रक्षकच भक्षक होतो तेव्हा जनता काय करणार, असा प्रश्न उपस्थित होतो. येथील एका मारहाण प्रकरणात अडकलेल्या युवकाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकाने पाच हजारांची लाच मागितली. युवकाने घरात लग्न असल्याचे सांगत दोन हजारात प्रकरण मिटवा असे म्हणताच, लाच मागणारी महिला पोलिस अधिकारी म्हणाली, 'ही काय भाजीमंडी आहे, एवढे घ्या आणि तेवढे घ्या !' युवकाने हे सर्व रेकॉर्डिंग करुन ठेवले आणि बुधवारी ते समोर आल्यानंतर ग्वाल्हेरमधील थाटीपूर पोलिस स्टेशनच्या उपनिरीक्षक सुरुचि शिवहरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पैसे दिले नाही तर घरातून उचलण्याची धमकी
पोलिस अधीक्षक हरिनारायण चारी मिश्रा म्हणाले, उप निरीक्षक सुरुचि शिवहरेवर ऑडिओ टेपच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे. ऑडिओ टेपमधील बातचित मार्च मधील आहे मात्र बुधवारी ती समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.

काय आहे टेपमध्ये
ऑडिओ टेपमध्ये मारहाणीच्या प्रकरणातील संशयित युवकाला पोलिस उपनिरीक्षक सुरुचि पाच हजार रुपये दिले नाही तर घरातून उचलून आणेल अशी धमकी देतात. त्यावर त्याने माझ्या घरात लग्न आहे. दोन हजार रुपये घ्या आणि मला मुक्त करा असे म्हटल्यानंतर, सुरुचिने त्याला लग्नाच्या घरातून तुला पोलिसांनी उचलून आणले तर काय इज्जत राहील याचा विचार कर, असा इशारा दिला. त्यासोबतच तुझ्यावर कोणतीही छोटी-मोठी कारवाई केली तर वकिल लावावा लागेल आणि तो खर्च केवढ्यात पडेल, असेही बजावले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत हे प्रकरण गेले तर तू मोठ्या खर्चात जाशील त्यासाठी वेळीच पाच हजार रुपये देऊन मोकळा हो असे सांगत सुरुचिने फोन दुसऱ्या एका महिला पोलिसाकडे दिला. कथित महिला पोलिसाने युवकाला पैसे घेऊन लवकर पोलिस स्टेशनला येण्याचे फर्मावले. फोन रेकॉर्डिंगमध्ये राजकुमार नावाच्या व्यक्तिचा मध्यस्थिसाठी उल्लेख झाला. कथित महिला पोलिस आणि राजकुमार हे कोण आहेत यांचा पोलिस शोध घेत आहेत.
तपास पोलिस उप आयुक्तांकडे
महिला पोलिस उपनिरीक्षक सुरुचि शिवहरेला ताब्यात घेण्यात आले असून तपास पोलिस उपायुक्तांकडे सोपवण्यात आला आहे. ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये दुसरी महिला कोण आहे याचाही शोध घेतला जात असल्याचे पोलिस आयुक्त हरिनारायण चारी मिश्रा यांनी सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, उपनिरीक्षक सुरुचि शिवहरेचे फोटो
बातम्या आणखी आहेत...