आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उज्जैन सिंहस्थमध्ये किन्नरांवरून सुरु झाला \'आखाडा\', पाकमधून येणार 200 भाविक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन- मध्य प्रदेशातील सिंहस्थमध्ये किन्नर आखाडा व आखाडा परिषदेत जुंपली आहे. सिंहस्थमध्ये पहिल्यांदा किन्नर आखाडा (तृतीयपंथी) सहभागी होत आहे. 21 एप्रिलला हा आखाडा आपली पहिली पेशवाई अर्थात मिरवणूक काढणार आहे. मात्र, आखाडा परिषदने यावर आक्षेप घेतला आहे.

सिंहस्थला 22 एप्रिलला प्रारंभ होत आहे. 21 मेपर्यंत चालणार्‍या सिंहस्थमध्ये शाही स्नानाच्या दिवशी दोन कोटी भाविक पोहोचण्‍याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काय आहे हा वाद?
- किन्नर आखाड्याच्या संस्थापकीय सदस्य लक्ष्मीनारायण त्रिपाठी (मुंबई) यांनी सांगितले की, सनातन धर्मात तृतीयपंथींचे अस्तित्व राहिले आहे. सिंहस्थमधील 13 आखाड्यांप्रमाणे आम्हाला मान्यता मिळालेली नाही. मात्र, आम्हाला कोणत्याही मान्यतेची गरज नाही.
- दुसरीकडे, आखादा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी किन्नर आखाड्याचे सर्व दावे फेटाळले आहे. सिंहस्थमध्ये किन्नर नाही, साधु-संत यांचा मान मोठा आहे. देवांनंतर साधु-संत आहेत. देशात 13 आखाडे असून त्यात कोणताही बदल करण्‍यात येणार नाही.
- दरम्यान, यंदाच्या सिंहस्थमध्ये 10 हजारांहून जास्त किन्नर सहभागी होणार असल्याचे काही महिन्यांपूर्वी किन्नर आखाड्याकडून जाहीर करण्यात आले होते.
- 21 एप्रिलला किन्नर आखाड्याची पहिली मिरवणूक निघणार आहे.

पाकिस्तानातून येणार 200 भाविक
- सिंहस्थमध्ये देश-विदेशातून येणार्‍या भाविकांची संख्या जास्त आहे. उल्लेखनिय म्हणजे यंदा पाकिस्तानातील 200 भाविक सहभागी होणार आहे.
- पहिल्या शाहीस्नानात रामघाटवर शिप्रामध्ये डुबकी लावतील.
- पाकिस्तानातील सिंध प्रांतातून येणारे भाविक 21 एप्रिलला आधी इंदूरला येतील. नंतर मग तेथून उज्जैनकडे रवाना होती.
- सिंहस्थमध्ये पाकिस्तानी भाविक सहभागी होत असल्याची ही पहिलीच वेळ आहे.

हरवलेल्या व्यक्तिच्या भाषेतच करण्यात येईल अनाउंसमेंट...
- देशातील 90 टक्के लोक 22 वेगवेगळ्या भाषा बोलतात. यात मालवा, निमाड व विंध्य क्षेत्रात 26 बोली भाषा बोलली जाते. या भाषांचे जानकार कंट्रोल रूममध्ये तैनात राहातील.
-ते हरवलेल्या व्यक्तिच्या भाषेत अनाउंसमेंट करतील.
-सिंहस्थच्या वेबसाइटवर हरवलेल्या व्यक्तिचे वर्णन, भाषा व अल्प परिचय देखील अपलोड करण्‍यात येणार आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, प्रत्येक भाविकावर 700 रुपये खर्च करेल सरकार...