आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचा झाला मुलगा: आई-वडिलांच्या उत्साहाला उधान, घोड्यावर बसवून काढली मिरवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्यप्रदेश) - 19 वर्षांची सिमरन, काही दिवसांपूर्वीच मुलगा झाली आहे. होय हे खरं आहे ! ही काही चित्रपट-नाटकातील कथा नाही. ज्यासिमरनला तिच्या आई-वडिलांना नटलेली नवरी बनलेले पाहायचे होते, आता ते तिला नवरदेव बनलेला पाहाणार आहेत. 19 वर्षांच्या सिमरनची बालपणापासून मुलगा बनून वडिलांच्या कामात त्यांना मदत करण्याची इच्छा होती. तिचे हे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करुन सिमरणचा समर झाला आहे. आता तिच्या आई वडिलांना एक मुलगा मिळाला आहे.
मुंबईत झाले ऑपरेशन
सिमरनचा समर होण्याची प्रक्रिय सोपी नव्हती. मुंबईतील लिलावती हॉस्पिटलमध्ये सिमरणवर दीड वर्षे उपचार करण्यात आले. या दरम्यान तिच्यावर चार ऑपरेशन करुन तिला मुलीचा मुलगा केले गेले. सुरुवातीला तिच्या आई-वडिलांना हे समजणे आणि पचायला अवघड होते. मात्र, नंतर तेही ऑपरेशनला तयार झाले. या ऑपरेशनसाठी 40 लाख रुपये खर्च आला. तिची आई अनिता आणि वडील सरदारसिंह मुजाल्दे यांनी मुलीच्या स्वप्नांना सत्यात उतरवले.
मुलाचे केले जल्लोषात स्वागत
मुजाल्दे कुटुंबात आता एक मुलगा देखील आहे. हे नातेवाईकांसह मित्र परिवाराला माहित होण्यासाठी त्यांनी नामकरणाचा मोठा सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी सर्वांना निमंत्रित केले. 14 डिसेंबरला झालेल्या या नामकरण सोहळ्यात सिमरणचे नाव समर ठेवण्यात आले. यानंतर समरला घोड्यावर बसवून त्याची मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणूकीत बँड पथकासमोर आई-वडिलांना आनंदात नाच केला. सिमरणचा समर झाल्याने तिच्या बहिणीही आनंदीत होत्या.

वयाच्या दुसर्‍या वर्षापासून हाव-भाव बदलले
सिमरण दोन वर्षांची होती तेव्हापासून मुलगा होण्याची तिची इच्छा होती. तिचे हावभाव देखील मुलांसारखेच होते. दोन महिन्यांपूर्वी लिंग परिवर्तन केलेल्या सिमरणमध्ये मुलगा होण्याची सुप्त इच्छा ही पहिल्यापासून होती. त्यामुळे तिने स्वतःमध्ये हा बदल करुन घेतला.

फोटो - बहिणींसोबत समर
पुढील स्लाइडमध्ये पाहा, समरची छायाचित्रे...