आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sivana River In Spate Pashupatinathn Temple Dipped Mandsour Indroe News Mp

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO: शिवना नदीला महापूर, भगवान पशुपतीनाथाचे मंदिर अर्धे बुडाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदसोर/इंदूर- मंदसोरसह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे शिवना नदी दुथळी भरुन वाहत आहे. आज (बुधवार) सकाळी पाणी इतके वाढले की, शिवनाच्या तिरावर असलेले प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर अर्धे बुडाले आहे. शिवना नदीने भगवान पशुपतीनाथाचे चरणस्पर्श केल्याचेही बोलले जात आहे.

यंदा पहिल्यांदा शिवनाला महापूर आला आहे. यापूर्वी जुलै महिन्यात शिवना नदीच्या पाण्याने पशुपतीनाथाचे चरणस्पर्श केले होते.

तरुण बेपत्ता..
शिवना नदीला आलेल्या महापूरात मंगळवारी एक तरुण वाहून गेला. रामघाट बॅरेक तो ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहाने तो वाहून गेला. रामघाटावर तैनात असलेल्या बचाव पथकाने त्याला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. एसडीएम, तहसीलदार नगरपालिका अधिकारी तसेच कर्मचारी, पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशीरा बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात आला. महफूस बब्न खान (20, रा. मदारपुरा) असे या तरुणाचे नाव आहे.

कालाभाटाचे दरवाजे उघडले...
संतंतधार पावसामुळे शिवना नदीला आलेल्या पुराचा जोर वाढला आहे. यामुळे कालाभाटा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याचे नगरपालिकेचे सहायक अभियंता सुधीर जैन यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रांत पाहा, शिवना नदीने पशुपतीनाथाला केला चरणस्पर्श...

(फोटो: शिवना नदीच्या पाण्याने भगवान पशुपतीनाथाचा केला चरणस्पर्श)