आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपुरातील 6 भाविकांचा भीषण अपघातात मृत्यू, वाहनाची झाडाला धडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशंगाबाद/पिपरिया (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशातील चौरागडच्या महादेव दर्शनासाठी गेलेल्या चंद्रपुरातील भाविकांचे वाहन झाडाला भिडल्याने ६ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी झाले. मृतांपैकी चार जणांचीच ओळख पटली असून जखमींवर पिपरियाच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली.
होशंगाबादचे एसडीओपी कमलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या माथा या गावातील १४ जण चौरागड महादेवाच्या दर्शनासाठी निघाले होते. विशेष म्हणजे वाहनाची ८ प्रवाशांची क्षमता असूनही त्यात १४ जण बसले होते. पचमढी वळणावर आल्यानंतर त्यांनी छिंदवाडाच्या भुराभगत मार्गाने चौरागड जाण्याचे ठरवले. दरम्यान, एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट झाडावर जाऊन आदळले. चालक संजयने लागलीच वाहनातून उडी मारत पळ काढला. अत्यंत भीषण प्रकारे घडलेल्या या अपघातातील मृत आणि जखमींना वाहनाला कापून बाहेर काढावे लागले.
दरम्यान, येथील िजल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या नातेवाइकांना १५ हजारांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मृतकातंमध्ये एका अडीच वर्षीय बालिकेचा तसेच ३० वर्षीय महिलेचाही समावेश आहे. मात्र, त्यांची अद्यापही ओळख पटलेली नाही. सर्व सातही जखमींवर मध्यप्रदेशातील पिपरिया येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मृतांची नावे
रमेश पोपराज (२५), जगदीश मोहितकर (३०), पंचकुला भाऊराम (३५), ज्योती किशनराव (५५),
सात जण जखमी
सुरेश अर्शकर (३२), सुषमा अर्शकर (३१), वंदना पोपराज (३०), अनिल पोपराज (१०), अंकिता अर्शकर (०३), उषा माेहितकर (२०), दिव्यांगी मोहितकर (०८)