आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Small Marathi Girl Expressed Her Last Wish Before Death, Watering Eye

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मृत्यूपूर्वी या मराठी चिमुकलीने व्यक्त केली अनोखी अंतिम इच्छा, आईवडीलांचे डोळे पाणावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश)- आजाराशी लढा देताना एका सात वर्षांची चिमुकलीने अखेर हात टेकले. तिचा संघर्ष संपुष्टात आला. पण त्यापूर्वी तिने दोघांचे आयुष्य उजळवण्याचे महान काम केले. साईनाथ वाडेकर यांची मुलगी भाव्या हिचा टायफाईडने मृत्यू झाला. हॉस्पिटलला नेत असताना तिने वडीलांकडे अखेरची इच्छा व्यक्त केली. तिची इच्छा ऐकून वडीलांच्या डोळ्यांतून भळाभळा पाणी वाहू लागले. मृत्यूपूर्वी भाव्याने सांगितले, ''पप्पा, मरणापूर्वी माझे डोळे दान करा. त्यामुळे माझे डोळे कधीही बंद होणार नाहीत.'' भाव्याच्या डोळ्यांनी दोघांच्या आयुष्यातील आंधार दूर होणार आहे.
एका महिन्यापूर्वी साजरा केला वाढदिवस
4 ऑगस्ट रोजी भाव्याचा वाढदिवस होता. संपूर्ण कुटुंबाने मोठ्या जल्लोषात तो साजरा केला. हा तिचा अखेरचा वाढदिवस असेल असे तेव्हा कुणाला वाटले नव्हते. वाढदिवसानंतर अगदी काही दिवसांत तिची प्रकृती खालावली. तिला टायफाईड झाला. औषधांचा काही परिणाम दिसून येत नव्हता. अखेर तिला गीता भवन रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिला डिस्चार्ज करण्यात आले होते.
मृत्यूपूर्वी म्हटले, पप्पा माझे डोळे कधी बंद होऊ देऊ नका
रात्रीच्या सुमारास तिची प्रकृती अचानक खराब झाली. तिला चाचा नेहरु रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिला नेत असताना रस्त्यात ती वडीलांना म्हणाली, की पप्पा, माझे डोळे कधी बंद होऊ देऊ नका. जर मी वाचली नाही तर माझे डोळे डोनेट करा.
रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिला वाचविण्याचा खुप प्रयत्न केला. पण प्रयत्नांना यश आले नाही. भाव्याने शाळेत एकदा नेत्रदानाविषयी ऐकले होते. तेव्हापासून ती कायम नेत्रदानाविषयी बोलायची.
दोन लोकांचे आयुष्य उजळले
डॉ. विजय भाईसारे यांनी सांगितले, की भाव्याचे डोळे दोन चिमुकल्यांना दिले जाणार आहेत. डोळे दान करण्याचा भाव्याचा निर्णय खरोखरी प्रेरणादायी आहे. लोकांनी तिचे अनुकरण करण्याची गरज आहे.
पुढील स्लाईडवर बघा, मृत्यूपूर्वी डोळे दान करुन दोघांचे आयुष्य उजाळणाऱ्या चिमुकल्या भाव्याचे इतर फोटो...