आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे खजिन्‍याची रक्षा करतात नाग, मंदिर उघडल्‍यावर पुजारीला दिसला असा नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवलिंगाच्‍या आसपास अशापद्धतीने पडलेली होती 10 फुट लांब कात. - Divya Marathi
शिवलिंगाच्‍या आसपास अशापद्धतीने पडलेली होती 10 फुट लांब कात.
ग्‍वालैर- श्‍यापूरमधील 16व्‍या शतकातील मानेश्‍वर मंदिराला पुजा-याने सोमवारी सकाळी उघडले तेव्‍हा समोरील दृश्‍य पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. मंदिरात शिव मुर्तिवर एक सफेद फुल आणि शिवलिंगाला लपेटलेली नागाची कात त्‍यांना दिसली. येथील स्‍थानिक लोकांचे म्‍हणणे आहे की, शिवरात्री आणि दिवाळीच्‍या आसपास बहुतेकदा येथे नाग आपली कात भगवान शिवला समर्पित करतात. 

शिवजीला समर्पित करतात कात  
- जवळपास 10 फुट लांबीची ही कात सकाळी मंदिर उघडताच पुजा-यांना दिसली. तेव्‍हापासून नागाने शिवलिंगाला समर्पित केलेली ही कात येथे चर्चेचा विषय बनली आहे.
- मानपूर परिसरात सिप नदीच्‍या किना-यावर गौंड राजा मानसिंह याच्‍या ऐतिहासिक किल्‍ल्‍यामध्‍ये पालकी महालात 16व्‍या शतकात मानेश्‍वर महादेव म‍ंदिराची निर्मिती करण्‍यात आली होती. यातील संगमरवराने बनलेल्‍या शिवलिंगावर नागाने आपली कात समर्पित केलेली आहे. या परिसरात याचे वृत्‍त पसरतातच भाविकांनी दर्शनासाठी मंदिरामध्‍ये गर्दी केली आहे.

किल्‍ल्‍यातील महाल आणि गुफांत राहतात नाग, सणांदरम्‍यान समर्पित करतात कात 
- जवळपास 500 वर्षे जुन्‍या असलेल्‍या मानेश्‍वर मंदिरात साप आणि त्‍यांची कात आढळण्‍याच्‍या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्‍या आहेत. बहुतेकदा शिवरात्री, श्रावण सोमवारी आणि नाग पंचमीच्‍या दिवशी नाग आपली कात येथे समर्पित करतात. 
- जवळपसा अडीच एकर परिसरात  बनलेल्‍या या किल्‍ल्‍यामध्‍ये अनेक महाल आणि रहस्‍यमयी गुफा आहेत. या किल्‍ल्‍यामध्‍ये मोठा खजिना दडलेला असून साप त्‍याची रक्षा करतात, अशी एक मान्‍यता येथील लोकांमध्‍ये आहे. 
- खजिन्‍याच्‍या शोधासाठी लोकांनी किल्‍ल्‍याला मोठे नुकसान पोहोचवण्‍याचा प्रयत्‍न करतात. मात्र त्‍याचदरम्‍यान तेथे नाग येऊन किल्‍ल्‍याचे रक्षण करतात. राजानियुक्‍त पुजा-याची पाचवी पिढी कुलदिप शुक्‍ला यांच्‍या मते किल्‍ल्‍यामध्‍ये अनेक प्रजातींचे नाग राहतात. अनेकदा हे साप मुख्‍य मंदिरातील गर्भ गृहमध्‍ये येऊन येथील मानेश्‍वर शिवलिंगाला लपेटलेले आढळलेले आहे.
 
सकाळ, दुपार, संध्‍याकाळ 3 वेळेस बदलतो शिवलिंगाचा रंग 
- 16व्‍या शतकात स्‍थापित झालेल्‍या मार्बलच्‍या या शिवलिंगाची खासियत म्‍हणजे याचा 3 वेळेस रंग बदलतो. 
- सूर्य किरणांचा बदलता अँगल आणि आसपासच्‍या झाडांच्‍या पानांच्‍या रिफलेक्‍शनमुळे सकाळी शिवलिंग गुलाबी रंगाचे दिसते. दुपारी सफेद तर संध्‍याकाळी ते नीळ्या रंगाचे दिसते.

पुढील स्‍लाइडवर पाहा, अधिक फोटो व माहिती...  
 
 
बातम्या आणखी आहेत...