आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : इंदूरची गृहिणी झाली वर्ल्ड वाइड स्‍पर्धेत फर्स्ट रनर अप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्नेहा भदौरिया - Divya Marathi
स्नेहा भदौरिया
इंदूर - मॅनमार येथे झालेल्‍या मिसेज इंडिया वर्ल्ड वाइड स्‍पर्धेत इंदौर येथील स्नेहा भदौरिया ही फर्स्ट रनर अप राहिली. त्‍यामुळे जगभरात इंदौरचे नाव उज्‍ज्‍वल झाले. या स्‍पर्धेत 42 भारतीय विवाहित महिला सहभागी होत्‍या. ही स्‍पर्धा 1 ते 9 ऑक्‍टोबरपर्यंत बँकाग, पटाया आणि यंगूनमध्‍ये तीन टप्‍प्‍यात झाली. या स्‍पर्धेत आर्मी, नेव्‍ही आणि एयरफोर्सशी निगडित स्‍पर्धकही सहभागी झाले होते. सगळेच प्रभावशाली आणि सुंदर होते. आपल्‍याला हा किताब मिळाला यावर सुरुवातीला विश्‍वासच बसला नसल्‍याचे तिने सांगितले. नंतर काही वेळाने या बाबत पती मेजर अजीत सिंह यांना माहिती दिली.
प्रत्‍येक महिला पूर्ण करू शकते आपले स्‍वप्‍न
इंदौरमध्‍ये जन्‍मलेली स्नेहा ही योग थैरेपिस्ट आणि डांस कोरियोग्राफर आहे. जेव्‍हा मला या स्‍पर्धेचा फर्स्ट रनरअप 'ताज' चढवला गेला तेव्‍हा मला विश्‍वास बसला की विवाहित महिलासुद्धा आपले स्‍वप्‍न पूर्ण करू शकतात.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, स्‍नेहा हिचे निवडक फोटोज...