आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीकमगड जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसाने स्वतःवर झाडली गोळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रेझरीमध्ये पडलेला पोलिस शिपायाचा मृतदेह - Divya Marathi
ट्रेझरीमध्ये पडलेला पोलिस शिपायाचा मृतदेह
भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याने बुधवारी दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. टीकमगड जिल्हाधिकारी कार्यालयातील ट्रेझरीमध्ये ही घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, पोलिस शिपाई राजेंद्र भट्ट (40) शिवनगर येथे राहात होते, ते ट्रेझरीमध्ये ड्यूटीवर होते.

सर्व्हिस गनने झाडली गोळी
बुधवारी दुपारी 12.40 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फायरिंगचा आवाज ऐकला. सर्वच ट्रेझरीच्या दिशेने धावत गेले. तिथे राजेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पोलिस शिपाई राजेंद्र यांनी सर्व्हिस 'गन थ्री नॉट थ्री'ने स्वतःवर गोळी झाडली होती. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो