आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिद पित्याला पाहून अशा रडल्या मुली, तरीही एकत्र येऊन ठोकला सलाम!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिलाई- सुकमा येथील दोरनापाल मध्ये शनिवारी शहीद एसटीएफचे प्लाटून कमांडर शंकर राव आणि जवान किरण देशमुख यांचे मृतदेह सोमवारी भिलाई येथे आणले गेले. कॅम्प-2 स्थित शंकर राव यांच्या घराबाहेर हजारो लोकांची गर्दी झाली होती. या गर्दीत शहिद शंकर राव यांच्या तीन मुली नेहा (15), चंचल (12) आणि चांदनी (7) आपल्या पित्याचा मृतदेह पाहून धो-धो रडत होत्या. तेव्हा मधली मुलगी चंचल उठली व एका सैनिकाप्रमाणे आपल्या शहिद पित्याला सल्यूट केला. हे पाहून नेहा व चांदनीही पुढे सरसावल्या व तिन्ही मुलींनी पित्याला एकत्र सलाम ठोकला.
शंकर राव यांची पत्नी बी. ईश्वरी आणि आई हेमलता यांनीही शहिदांना सलामी दिली. राजकीय इतमामांत रामनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अतिम संस्कार करण्यात आले. जवान किरण देशमुख यांच्यावर सरकारी इतमामात रिसाली वस्तीवरील अंतिम संस्कार करण्यात आले.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, अंतिम यात्रेचे फोटोज...