आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलानेच आईला निर्वस्त्र करून केली मारहाण, बापाचा कापला अंगठा; \'हे\' होते कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमीन वाटून द्या म्हणत मुलाने वडील आणि आईला विवस्त्र करून बेदम मारहाण केली. - Divya Marathi
जमीन वाटून द्या म्हणत मुलाने वडील आणि आईला विवस्त्र करून बेदम मारहाण केली.
गुना (भोपाळ) - शहराला लागून असलेल्या अजरोडामध्ये मुलानेच आपल्या वडिलांना मारहाण करण्याचे प्रकरण समोर आले आहे. त्याने सासरवाडीच्यांना सोबत घेऊन वडिलांची बोटे पकडून सरळ हाताचा अंगठा कापला. तर विरोध करणाऱ्या आईला विवस्त्र फिरवले. यानंतर माहिती मिळताच पोलिस पोहोचले. त्यांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आली आहे.
 
असे आहे प्रकरण...
- सूत्रांनुसार, वृद्ध वडील अमरसिंह आणि आई अयोध्या देवी शेतात स्वत:ला राहण्यासाठी झोपडी बनवत होते. तेवढ्यात संध्याकाळी 5 वाजता मोठा मुलगा मुकेश ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये त्याची पत्नी आणि सासरवाडीच्या लोकांसह आला. 
- यात सून कृष्णाबाई, नातू अरुण, त्याचा साला हरिचरण आणि इतर लोक होते.
- ट्रॅक्टरमधून उतरत मोठा मुलगा मुकेश थेट आपल्या बापाकडे आणि म्हणाला की, मला माझी जमीन वाटू द्या. यानंतर त्याने मारहाण सुरू केली. मुलाने आपल्याच बापाला धमकी देत म्हटले की, हात तोडून टाकीन.
- यानंतर सर्वांनी एकेक करून त्यांना मारहाण सुरू केली. मुकेश वडिलांच्या दोन्ही हातांवर दांडक्याने प्रहार केला. डाव्या हाताचा अंगठाही हत्याराने कापला. मग बापाचे कपडे फाडले. यानंतर शेतात फरपटत नेत झाडाजवळ घेऊन गेला. तेथे त्यांचे झाडामागे दोन्ही हात बांधले.
- आईने विरोध केला तेव्हा मोठ्या मुलाने त्यांना चापटा मारल्या. यानंतर मुकेश आणि त्याचा साला हरिचरणने स्वत:चे आईचे कपडे उतरवून दांडक्याने बेदम मारहाण केली. निर्वस्त्र अवस्थेत मारत आपल्या आईला शेताच्या दुसऱ्या कोपऱ्यातील कच्च्या घरात नेले.
- यानंतर त्यांनी आईला खोलीत ढकलून बाहेरून दार लॉक केले. ही घटना संध्याकाळी 7 वाजता घडली. रात्री साडेआठ वाजता वृद्ध आई शिडी लावून कशीबशी बाहेर आली. यानंतर तिथून जवळच असलेल्या रोडवर पोहोचून वाटसरूंना डायल 100 वर फोन करायला लावून माहिती कळवली. रात्री 9 वाजता पोलिस पोहाचले आणि त्यांनी वृद्ध बापाला सोडवले.
 
क्रॉस एफआयआर दाखल केली आहे...
- पोलिस इन्स्पेक्टर म्हणाले, याप्रकरणी दोन्ही पक्षांनी एफआयआर दाखल केली आहे. मुकेशच्या तक्रारीवरून वडील अमरसिंह, आई अयोध्याबाईवर जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण नोंदवण्यात आले आहे. तर बाप अमरसिंहचा दुसरा मुलगा गोपालच्या तक्रारीवरून मुकेशसहित इतर 8 आरोपींविरुद्ध मारहाणीची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...