आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान कसेही असले तरी सुरक्षित राहणार सोयाबीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - हवामान बदल व पावसाची अनियमितता यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशात त्यांना रेज्ड अँड बँड पद्धतीचे विदेशी तंत्रज्ञान लाभदायक ठरू शकते. मध्य प्रदेशात उज्जैन जिल्ह्यातील मालवा येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. बदलत्या हवामानात सोयाबीनचे पीक तग धरून राहावे यासाठी कृषी शास्त्रज्ञ, कृषी अभियंता व अधिकाऱ्यांच्या मदतीने जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी रेज्ड अँड बँड पद्धती हे विदेशी तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढण्यासदेखील मदत होणार आहे.
रेज्ड अँड बँड नावाच्या या पद्धतीमुळे केवळ सोयाबीनचे उत्पादनच चांगले होणार नाही तर हवामान बदलाचादेखील त्यावर तितकासा परिणाम होणार नाही. बलेडी गावातील शेतकरी जगदीशचंद्र पांचाल यांनी या पद्धतीने यंदा १२ हेक्टर शेतात सोयाबीनची पेरणी केली आहे. पांचाल यांनी सांगितले की, सामान्य पद्धतीने पेरणी केल्यानंतर प्रतिबघा ४ ते ५ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होत होते. परंतु नव्या पद्धतीने ७ ते ८ क्विंटल उत्पादन होईल, असा विश्वास आहे. कारण सोयाबीनचे जे बियाणे त्यांनी पेरले होते त्याची रोपे आता १. ५ फुटांची झाली आहेत. पांचाल यांनी सांगितले की, आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांनीही पेरलेल्या सोयाबीनच्या तुलनेत नव्या पद्धतीने पेरलेल्या सोयबीनची वाढ वेगाने होत आहे.
राज्यात उज्जैन जिल्ह्यात पहिल्यांदाच या पद्धतीने सोयाबीन पेरणीचा प्रयोग करण्यात आला आहे. त्याचा फायदा होऊन उत्पादन दुप्पट होईल. तसेच पीक सुरक्षितदेखील राहू शकेल.
-पी. सी. शिसोदिया, सहायक मेकॅनिकल इंजिनिअर
विदेशी तंत्रज्ञानावर आधारित रेज्ड अँड बँड पद्धतीची माहिती गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांना दिली जात आहे. त्याचे चांगले परिणाम िदसून येत आहेत. -
रामेश्वर पटेल, उपसंचालक, कृषी
रेज्ड अँड बँड पद्धती म्हणजे काय?
रेज्ड अँड बँड ही विदेशी पद्धत आहे. जपान व चीनमध्ये त्याची सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. या पद्धतीत जमीन भुसभुशीत केली जाते. जमिनीत सहा इंच उंचीवर बियाणे पेरले जाते. तसेच एका ठरावीक अंतरावर पेरणी होते. जास्त पाऊस झाला तर पाणी नालीवाटे बाहेर जाते आणि कमी पाऊस झाल्यास पाणी नाल्यांमध्ये थांबून रोपांचे पोषण व्यवस्थित होते. त्यामुळे िरज्ड अँड बँड पद्धती दोन्ही परिस्थितीत उपयुक्त ठरू शकते.
कमी खर्चात चांगले उत्पादन शक्य
सर्वसामान्य परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी जास्त उत्पादनासाठी शेतात अतिशय कमी अंतरावर िबयाणे पेरतात. त्यामुळे रोपे मोठी झाल्यानंतर एकमेकांना घासतात. त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. नव्या पद्धतीत बियाणे पेरणीतील योग्य अंतराला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे प्रतिहेक्टरवर कमी बियाणे लागते. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी याची सॅम्पल पेरणी करुन त्याचे उत्पादन घेतले होते. त्याच सकारात्मक परिणाम िदसून आल्याने पांचाल यांनी यंदा संपूर्ण शेतात याच पद्धतीने सोयाबीन पेरणी केली आहे
बातम्या आणखी आहेत...