आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विशेष मूल’ दत्तक घेऊन आदित्य बनला देशातील कमी वयाचा अविवाहित पालक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - पुण्यातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या २८ वर्षीय आदित्य तिवारीसाठी नव्या वर्षाची सुरुवात एखादी मोठी लडाई जिंकल्याच्या अनुभवासारखी आहे. तो एका विशेष मुलाला दत्तक घेण्यासाठी संघर्ष करीत होता. शुक्रवारी सायंकाळी ५ वा. मातृछाया परिसरात दीड वर्षाच्या बिन्नीला त्याने कडेवर घेतले. तो देशातील पहिला अविवाहित पालक बनला आहे ज्याने एवढ्या कमी वयात बिन्नीसारख्या विशेष मुलाला दत्तक घेतले आहे.

आरोग्याच्या अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या बिन्नीसारख्या अनेक मुलांसाठी हा आशेचा किरण आहे. बिन्नी डाउन सिंड्रोम ने पीडित आहे. डोळे, हृदयात छिद्र अशा गंभीर समस्यांनी तो त्रस्त आहे. सप्टेंबर २०१४ ला इंदूरमध्ये एका नातेवाइकाच्या वाढदिवसानिमित्त मिशनरीज ऑफ चॅिरटीच्या ज्योती निवासात एक कार्यक्रम झाला. या निवासात असलेल्या अनेक मुलांपैकी एक असलेल्या बिन्नीकडे आदित्यचे लक्ष गेले. त्यानंतर त्याने त्याला दत्तक घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पुण्यात राहूनही त्याच्याशी संपर्क ठेवला. उपचार, पालन-पोषणसाठी मदत पाठवली. ऑगस्ट २०१५ मध्ये बिन्नीला मिशनरीच्या इंदूर शाखेतून भोपाळ शाखेत पाठवण्यात आले. आदित्यने इंदूर-भोपाळ दरम्यान २० हून अिधक हेलपाटे मारले. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून १०० हून अधिक खासदार आणि मंत्र्यांना आपली इच्छा कळवली. १ हजारहून अिधक ई मेल केले. पत्र पाठवले. सारखे फोन करीत राहिले. तमाम सरकारी कामांची पूर्तता केल्यानंतर त्याला एक जानेवारीला भोपाळ येथे बोलावण्यात आले. ते पहिल्यांदाच आपले बालमित्र विक्रम तिवारी, विशाल खंडेलवाल आणि विधीश मुदंडा यांच्यासमवेत आले. मातृछायेच्या रुपात त्याला बिन्नी मिळाला. आता बिन्नीचे नामकरण अवनीश असे करण्यात आले आहे.

काराने नियम बदलले
आदित्यने केलेल्या संघर्षामुळे दत्तक घेण्यासाठीच्या नियमांत काराला (केंद्रीय दत्तक अभिकरण) सुलभता आणावी लागली. अविवाहित पालकासाठीचे कमीत कमी वय २५ पासून ५५ वर्षे करण्यात आले. हा निर्णय आदित्यसाठी पहिला विजय ठरला. यापूर्वी मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत अडचणी होत्या. आदित्य अविवाहित, कमी वयाचा होता. काराच्या दिशानिर्देशांनुसार वयाच्या ३० वर्षांपर्यंत मूल दत्तक घेता येत नव्हते.

आदित्य आणि बिन्नीची भोपाळ ते दिल्लीपर्यंत इतकी चर्चा झाली की, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मेनका गांधी या भोपाळला आल्यानंतर बिन्नीला भेटायला गेल्या. त्यावेळी तो तेथील मातृछायामध्ये होता. बिन्नीला दत्तक देण्याच्या सूचना मेनका गांधी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

काही औपचारिकता होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी वेळ लागला. दत्तकपूर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बिन्नीला आदित्यकडे सोपवण्यात आले आहे. - अमिता जैन, उपाध्यक्ष, मातृछाया व्यवस्थापन समिती.