आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्लॅक सूट - हायटेक शस्त्रांनी सज्ज असतात SPG COMMANDO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसपीजी कमांडो - फाइल फोटो - Divya Marathi
एसपीजी कमांडो - फाइल फोटो
भोपाळ - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर स्थापन करण्यात आलेल्या कमांडो ग्रुपचे नाव आहे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप अर्थात एसपीजी कमांडो. भोपालमध्ये 10 सप्टेंबरपासून हिंदी संमेलनाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले एसपीजी कमांडो भोपाळमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना वेगवेगळी जबाबदारी देण्यात आली आहे.
हे आहे एसपीजी कमांडोचे वैशिष्ट्य
इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर एसपीजी कमांडो फोर्स स्थापन करण्यात आले. पंतप्रधानांसह हे कमांडो त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेतही तैनात असतात. पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात एसपीजी कमांडो काही खास कार्यक्रमांमध्येच सूटमध्ये असतात. हे कमांडो FNF-2000 असॉल्ट रायफलने सज्ज असतात. ही एक फुली अॅटोमॅटिक गन आहे. त्यासोबतच या कमांडोजकडे ग्लोक 17 नावाची एक पिस्टल असते. स्वतःच्या संरक्षणासाठी कमांडो एक लाइटवेट बुलटेप्रुफ जॅकेट परिधान करतात. सहकारी कमांडोसोबत बोलण्यासाठी त्यांच्या कानांमध्ये इयरप्लग लावलेले असते किंवा ते वॉकीटॉकीने एकमेकांशी संपर्क करतात.
- एसपीजी सुरक्षिततेच्या दृष्टीने एल्बो आणि नी गार्ड वापरतात.
- एसपीजी कमांडोचे बुट हे अशा पद्धतीचे असता की ते कोणत्याही जमीनीवर घसरणार नाहीत.
- त्यांच्या हातावर विशिष्ट पद्धतीने रुमाल बांधलेले असता. याचा फायदा त्यांना चकमकी प्रसंगी होतो.
- एसपीजींचे गॉगल्स आणि चष्मे अशा पद्धतीने तयार केलेले असता की युद्धच्या वेळी त्यांना त्याचा काही त्रास होणार नाही.

केव्हा झाली स्थापना
एसपीजी फोर्सची स्थापन 1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झाली. त्याआधी दिल्ली पोलिसांची एक स्पेशल तुकडी पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात राहात होती. त्यांच्या चारही बाजूंनी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) त्यांच्या भोवती कडे करुन उभी राहात होती.

पुढील फोटोजमधून पाहा, SPG कसे करता पंतप्रधानांची सुरक्षा