आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांनी पसरवली दहशत; मुलींची छेडछाड, जाळपोळ, मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्यप्रेदश) - मध्यप्रेदशातील ग्वाल्हेर येथे सैन्य भरतीसाठी आलेल्या हजारो युवकांनी हुल्लडबाजी करत जे केले त्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे, अजुनही परिस्थिती पूर्ववत झालेली नाही. जवळपास सात तास युवकांनी छेडछाड, लुटमार, मारामारी आणि जाळपोळ करुन शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवली. भरतीसाठी आलेल्या युवकांनी तरुणींचे कपडे फाडणे, एटीएम फोडणे, रस्त्यावरील फेरीवाल्यांचा माल लुटणे, वाहनांची जाळपोळ आणि रेल्वेवर दगडफेक यासारखे गंभीर गुन्हे केले आहे.
मुलींवर अश्लिल कॉमेंट, वडीलांनी विरोध केला तर मारहाण मुलीचे फाडले कपडे
एक वडील त्यांच्या मुलीला घेऊन कॉलेजला निघाले होते. तेव्हा सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांनी त्या मुलीची छेड काढली. तिच्या वडिलांनी गाडी थांबवून युवकांना बोलावले. त्यावर त्या तरुणांनी त्यांना रॉडने मारहाण केली. त्यांच्या डोक्यात रॉड मारला. ते रस्त्यावर कोसळले. त्या तरुणांना मुलीने विरोध केला असता तिचे कपडे फाडण्यात आले. ती हतबल होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांकडे पाहात फक्त रडत राहीली. बेभान आणि गुंड प्रवृत्तीचे ते युवक त्या मुलीच्या हतबलतेवर मात्र खिदळत होते. त्या मार्गावरुन शाळेला जाणारी मुले दहशतीचे वातावरण पाहून घरी परतली. तर, दहशत पसरवणार्‍या त्या युवकांनी रस्त्यावर दगडफेक केली आणि दुभाजकावरील रोलिंग तोडली.
आले होते सैन्यात भरती होण्यासाठी, दहशत पसरवून गेले
शहरातील मेला मैदानावर बुधवारी सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यातील युवक दोन दिवसांपासून डेरेदाखल झाले होते. मेला मैदानासह रेसकोर्स रोडवर या युवकांनी बस्तान मांडले होते. भरती दरम्यान फेल झालेल्या युवकांनी पुन्हा रनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी गोंधळ घातला. त्यात 8 जण जखमी झाले. जखमींपैकी काहींचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली आणि दगडफेक सुरु झाली. त्यानंतर भरती रद्द करण्यात आली. त्यामुळे संतप्त युवक आक्रमक झाले आणि त्यांनी दिसेल ती वाहने, दुकाने फोडण्यास सुरवात केली. पाहाटे चार ते सकाळी 11 पर्यंत मेला मैदानाजवळील परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.
पोलिस-अधिकार्‍यांनाही मारहाण
संतप्त युवकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मेला मैदानावर 10 राऊंड फायर केले आणि 12 अश्रूधुराचे नळकांडे फोडले. त्यासोबतच लाठीचार्ज केला मात्र, संतप्त युवकांवर नियंत्रण मिळविता आले नाही. यात 35 पोलिस कर्मचार्‍यांसह अधिकारीही जखमी झाले. युवकांच्या गर्दीने त्यांना पिटाळले आणि मारहाण केली. यानंतर भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधीत छायाचित्र