आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चहावाला\' पंतप्रधान आणि \'पंक्चरवाला\' मंत्री, वाचा या केंद्रीय मंत्र्याची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्यप्रदेशच्या सागरमध्ये राहणारे टीकमगढचे खासदार डॉ. वीरेन्द्र कुमार यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सध्या सोशल मीडियावर त्यांच्याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. स्कूटरवर मतदारसंघात फिरत असतानाचे त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. त्याबरोबरच चहावाला पंतप्रधान बनल्यानंतर आता 'पंक्चरवाला' मंत्री बनला अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. त्याचे कारण म्हणजे डॉय वीरेंद्र कुमार हे अत्यंत कठीण परिस्थितीतून पुढे आलेले आहेत.  

भाजपचा गड असलेल्या मध्य प्रदेशात वीरेंद्र कुमार हे पक्षाचा दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे डॉ. वीरेंद्र कुमार हे सहा वेळा टिकमगड मधून निवडून आलेले आहेत. लहानपणापासून संघाच्या तालमीत वाढलेले वीरेंद्र कुमार हे गोरक्षाच्या मुद्द्यावरही आक्रमक आहेत.  

कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी कुमार यांना लहानपणीच पंक्चरच्या दुकानावर काम करावे लागले होते. आजही रस्त्याने जाताना त्यांना कोणी पंक्चर काढताना दिसले तर, ते थांबून त्याला काही टिप्स देतात. अनेकदा कुमार स्वतः त्या व्यक्तीला पंक्चर काढूनही दाखवतात. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, वीरेंद्रकुमार यांच्याविषयी अशीच काही रंजक माहिती... 
 
बातम्या आणखी आहेत...