आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅन्डिट क्वीनच्या आई-बहिणीवर उपासमारीची वेळ, तर पती पेट्रोल पंप मालक...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलनदेवी नाव घेतल्या बरोबर डोळ्यासमोर चित्र उभे राहाते ते खाकी कपड्यांमध्ये हातात बंदूक घेतलेली आणि डोक्याला लाल रुमाल बांधलेली महिला. तिच्या डोळ्यात जळजळीत राग दिसायचा. तिच्या येण्याची चाहूल लागल्यानंतर चांगल्या चांगल्यांची पळापळ व्हायची. त्या वाघिणीची डरकाळीही उरात धडकी भरवणारी असायची. ‘निकलो बाहर सालों, मै आयी हूँ’. मात्र आज ती नाही आणि तिची डरकाळीही नाही.

आपल्याला सवय झाली आहे ती व्यक्तीच्या चढत्या आलेखाकडे मानमोडेपर्यंत पाहाण्याची, झोका खाली आल्यानंतर मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष्य करतो. आज अशाच दोन दुर्लक्षित महिलांवर divyamarathi.com प्रकाशझोत टाकणार आहे.
(का होत आहे चर्चा - बॅन्डिट क्वीन फुलनदेवीचा 10 ऑगस्ट रोजी जन्मदिवस आहे.)

मुलादेवी आणि रामकली या मायलेकी. एकेकाळची बॅन्डिट क्वीन फुलनदेवीची आई आणि बहिन. खरं वाटत नाही ना, एखाद्या माजी खासदाराचे कुटुंब असेही राहात असेल म्हणून. मात्र हे खरे आहे. फुलनदेवीची आई आणि बहिन दोनवेळच्या अन्नालाही पारख्या झाल्या आहेत. 

मुलादेवी आणि त्यांची 50 वर्षांहून मोठी मुलगी रामकली या दोघी उत्तरप्रदेशातील यमुनेच्या तीरावर वसलेल्या काल्पी या जालौन जिल्ह्याच्या छोट्या तालुक्यातील शेखपुरगुढा या गावात एकाकी आयुष्य जगत आहेत. यांच्या घराची अवस्था पाहूनच आज यांची आर्थिक स्थिती कशी असेल याचा अंदाज येतो.

पुढील स्लाइडमध्ये,
> काय करते फुलनदेवीची आई..
> आत्मसमर्पण करताना ठेवल्या होत्या अटी
> रामकलीच्या हाता बंदूक आली तर...
बातम्या आणखी आहेत...