आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटलेल्या हातांत आले २१ महिन्यांनी बळ, मध्य प्रदेशातील तरुण करताहेत इतरांना मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - दोन वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात विशाल झाय या तरुणाने त्याचे दोन्ही हात गमावले. डॉक्टरांनी १४ तासांची प्रदीर्घ शस्त्रक्रिया करून हात जोडले खरे, परंतु त्यात शक्तीच नव्हती. २१ महिन्यांनंतर त्या हाताच्या नसांमध्ये थोड्याफार हालचाली दिसू लागल्या. हात गमावल्यानंतर आता विशाल (२०) फिजिओथेरपी विभागात आपल्यासारख्या पीडित रुग्णांना आपले हात दाखवून, अनुभव सांगून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. तो गेल्या २१ महिन्यांपासून हे काम नित्यनेमाने करत आहे. आपल्या हातांमध्ये पूर्वीसारखीच ताकद परत यावी आणि आपण पित्याचा आधार बनावे हा त्याचा एकच उद्देश आहे.

विशालने सांगितले, ३० जून रोजी वडिलांऐवजी मला कामावर पाठवले. कामाच्या वेळी प्रेसमधील पेपर कटिंग मशीनमध्ये माझे दोन्ही हात तुटले. सहकाऱ्यांनी तत्काळ चिरायू हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मी तर आशाच सोडली होती, परंतु डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून हात पुन्हा जोडले. फिजिओथेरपी घेतल्यानंतर आता हातांच्या नसांत पुन्हा हालचाल जाणवू लागली असून थोडीफार ताकद परतली आहे. वर्षभरापूर्वी एक किलो वजन उचलू शकत नव्हतो. आता चार किलो वजन उचलू शकतो. फिजिओथेरपी युनिटमध्ये विशाल रोज ५-६ रुग्णांचे कौन्सिलिंग करतो. त्याचे अनुभव, तुटलेल्या हाताचे फोटो, संघर्षकथा सांगून रुग्णांना दिलासा देत राहतो.
बातम्या आणखी आहेत...