आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story Behind Model Coach Of Indian Railway Designed In Bhopal

ड्रॉइंग रुम नाही रेल्वेचे मॉडेल कोच, जाणून घ्या यांना घडवणाऱ्या टीमची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- निशातपूरा रेल्वे कोच फॅक्टरीत 12 ते 15 वर्षे जुने डबे आणले जातात. डागडुजी करुन ते पुन्हा वापरण्यासाठी तयार करणे हे काम येथे केले जाते. रेल्वेचे मॉडेल कोच येथेच तयार करण्यात आले. ते समोर आले तेव्हा एखाद्या पॉश ड्रॉइंग रुमसारखे दिसत होते. रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी याचे कौतुक केले आहे. जाणून घ्या रेल्वेचे मॉडेल कोच तयार करण्यामागची कहाणी....
- हे मॉडेल कोच भारतीय रेल्वेचा नवीन चेहरा आहे. 111 कोचना नवीन स्वरुप देण्याचे आव्हान या कारखान्यासाठी फार मोठी गोष्ट होती.
- येथे डिझायनर नाहीत, विशेषज्ञ नाहीत, साधन सामग्री नाही. तरीही येथील टीमने रेल्वेच्या डब्यांना नवीन स्वरुप प्रदान केले.
- 2011 मध्ये हे कोच तयार करण्यास सुरवात झाली. दीड वर्षांत हे कोच तयार झाले.
- प्रवाशांना आरामदायी प्रवासासह आकर्षक इंटेरिअर मिळावे असा या मागे उद्देश होता.
- येथील टीमला आधी एक डब्याचे काम देण्यात आले होते. त्यावर वरिष्ठ समाधानी राहिल्याने नवीन ऑर्डर देण्यात आली.
स्पर्धा चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्सरीसोबत
रेल्वेची ही इनहाऊस स्पर्धा चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीसोबत होती. दोन्ही कारखान्यांमध्ये मोठी तफावत आहे. तेथे सर्व सुविधा आहेत. मोठी टीम, एक्सपर्ट्स आणि अनुभव. येथे केवळ आव्हान होते. फॅक्टरीचे चिफ वर्क्स मॅनेजर लक्ष्मीरमण यांनी सांगितले, की उपलब्ध साधनांच्या मदतीने हे आव्हान पेलणे जरा जोखमीचे होते. कामात वारंवार व्यत्यय आले. डेडलाईन बदलावी लागली. पण आम्ही जिद्दीने काम घेतले. आम्हाला परफेक्ट प्रोडक्ट समोर आणायचे होते. त्याला कुणी रिजेक्ट करणार नाही याची काळजी घ्यायची होती.
डिझायनिंग- कोचमध्ये आकर्षक इंटेरिअर
नवीन कोचमध्ये आकर्षक इंटेरिअर राहावे यासाठी रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांनी 2013 मध्ये इटली आणि जर्मनीचा दौरा केला. पण तेथील आणि भारतातील गरजांमध्ये बरेच अंतर आहे. त्यामुळे तेथील सुविधा भारतीय लोकांना कशा देता येतील. त्यासाठी कोणते बदल करावे लागतील याचा अभ्यास करण्यात आला. प्रवाशांना केंद्रबिंदू मानून सुविधा डिझाईन करण्यात आल्या. यासाठी बंगळुरुमध्ये असलेल्या खासगी संस्थेचीही मदत घेतली. बऱ्याच वेळा प्रयोग केला. त्यानंतर निश्चित स्वरुप समोर आले. इतर कोच फॅक्टरीत डिझाईन बोर्ड असतात. तशा स्वरुपाच्या सुविधा असतात. पण येथे थेट प्रयोग करायचा होता. तो आम्ही यशस्वी करुन दाखवला.
अशा आल्या समस्या
चांगले मटेरियल मिळणे ही एक समस्या होती. डेप्युटी चिफ मेकॅनिकल इंजिनिअर विश्वा लाल यांनी याचा विशेष अभ्यास केला. त्यानंतर मटेरियल मिळाले. पण ते वापरणे जरा कठिण होते. स्टेनलेस स्टीलचे कटिंग करता येईल याची सोय नव्हती. दुसऱ्या मटेरियलचा उपयोग म्हणजे गुणवत्तेशी तडजोड करावी लागली असती. त्यानंतर काही लहान मोठ्या कारखान्यांना भेटी दिल्या. येथील आयडिया घेतली. मशिन असेंबल केले. काम पुन्हा सुरु झाले.
आव्हानांवर केली मात
वर्क मॅनेजर संजय तिवारी आणि एस. पी. गोस्वामी यांनी सांगितले, की आम्हाला प्रवाशांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष द्यायचे होते. त्यामुळे कोणताही धोका राहू नये. तसेच लुकही चांगले मिळावे अशी योजना आखली. वायरिंग स्कीमसाठी आरडीएसओ आणि रेल्वे बोर्डच्या इलेक्ट्रिकल विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगावे लागले, की नेमके काय हवे आहे. त्यांनीही सहकार्य केले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, भारतीय रेल्वेच्या नवीन स्वरुपातील डब्यांचे आकर्षक इंटेरिअर.... अशी केली रंगांची निवड... भारत भवनातून मिळाली प्रेरणा....