आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOMAN PRIDE AWARD: जिद्द आणि मेहनतीने जिंकले जग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी माझ्या आयुष्याचा सारांश शेअर करीत आहे. माझे दोन्ही हात एवढे लहान आहेत, की कानांपर्यंतही पोहोचू शकत नाहीत. दोन्ही हातांना मोजून केवळ पाच बोटे आहेत. माझ्या आईने मला प्रथम बघितले तेव्हा तिला भोवळच आली होती. दुसरीकडे, माझे वडील अगदी देवाचे रुप होते. माझ्या मुलीला कसे मोठे करायचे आहे, हे माझे काम आहे, असे ते नेहमी म्हणत. एक दिवस ते माझ्यासाठी छोटासा ढोलक घेऊन आले. त्यानंतर मी तो वाजवू लागली.
वडीलांच्या एका मित्राने तर मला अगदी विषाचे इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर वडीलांनी त्या मित्राचे कधी तोंड बघितले नाही. माझी मुलगी याच हातांनी यश प्राप्त करून दाखवेल आणि मला तिचा अभिमान असेल, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. परंतु, एक दिवस वडीलांना हृदयविकाराचा धक्का बसला. यातच त्यांचे निधन झाले. त्यावेळी मी 8 वर्षांची होती. त्यांच्याशिवाय जगणे मला अशक्य होते. अशा मुलीला सोडून ते हे जग सोडून गेले. त्यानंतर मला अभ्यासासाठी मोठ्या भावाजवळ बिलासपुरला पाठविण्यात आले. तो तेथे नोकरी करीत होता. जावरा येथील हिंदी मिडिअमच्या शाळेतून माझा दाखला इंग्रजी मिडिअमच्या सेंट्रल स्कुलमध्ये करण्यात आला. माझ्या मनाला प्रचंड वेदना झाल्या. तेथे मी चेष्ठेचा विषय झाली. कारण मला इंग्रजी समजत नव्हती. माझे वडील आता या जगात नव्हते. माझ्या लहान वयातील गरजाही पूर्ण होत नव्हत्या. माझ्या चेहऱ्यावर हास्याच्याऐवजी भीती आणि न्युनगंडाची भावना झळकू लागली. माझे हात स्कूल बॅगच्या मागे लपू लागले होते.
काही वर्षांनी माझी अशी परिस्थिती झाली, की मला जावरा येथे पाठविण्यात आले. मी गप्पच होते. माझ्यात आता अपमानाचा लाव्हा धगधगत होता. मी शाळेत शिकलेल्या गुणांना माझे हत्यार केले. यात चित्रकारी, हस्तशिल्पकला आणि नृत्य यांचा समावेश होता. बी. ए. आणि एम. ए. इंग्रजी लिटरेचरमध्ये पूर्ण केले. U.D.T मध्ये नोकरी मिळाली, पण मी स्वीकारली नाही. काही तरी वेगळे करण्याची माझी इच्छा होती.
एक दिवस एका ब्युटी पार्लरमध्ये माझ्यात असलेली कला मला दिसून आली. बस हाच माझा मार्ग होता. मी माझी बहिण बलजित (जी माझी हिंमत आहे.) हिला आणि स्वतःला प्रॉमिस दिले, की जगातील जे व्यक्ती माझ्या हातांना खराब समजतात, त्यांना याच हातांनी उत्तर देईल. रंग नसलेल्या चेहऱ्यांमध्ये मी रंग भरून दाखवेल. मी पाया रचला. एक काच आणि खुर्चीसह जावरा येथे पहिल्या ब्युटी पार्लरची सुरवात केली. येथून सुरू झाला माझा आत्मसन्मान आणि आत्मविश्वासाची गाथा. ज्यात आता पंख लागले होते. जेव्हा मला पंतप्रधान रोजगार योजनेतून 50,000 रुपये मिळाले, तेव्हा माझा उत्साह द्विगुणीत झाला. एकानंतर एक डिप्लोमा आणि एकानंतर एक अवॉर्ड माझ्या झोळीत पडत गेले.
मी माझ्या शीन ब्युटी पार्लरचे रुपांतर ब्युटी क्लिनिकमध्ये केले. त्वचा आणि केसांशी संबंधित समस्यांवरही मी उपचार करीत होती. 19 फेब्रुवारी 2011 मध्ये चेन्नईत मिळालेल्या एबिलिटी मास्टरी अवॉर्डने माझ्या हातांना एक नवी ओळख मिळाली. गर्ल विथ गोल्डन हॅंड्स. माझे आई-वडील मला महागड्या सोई-सुविधा देऊ शकले नाही. परंतु, त्यापेक्षा मौल्यवाण संस्कार त्यांनी माझ्यावर केले. जेव्हा एखादी क्लायंट मला म्हणते, की आम्हाला तुमच्या हातांनीच काम करायचे आहे तेव्हा माझे मन अभिमानाने भरून जाते.
3 डिसेंबर 2013 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासमोर उभे राहण्याचा सन्मान मिळाला. तेथे माझ्या गळ्यात मेडल पडले तर हातांच्या तीन बोटांमध्ये आऊटस्टॅंडिंग क्रिएटिव्ह अॅडल्टचे प्रशस्तीपत्र. पप्पा तुम्ही खुश आहात ना....
ही स्टोरी बबली गंभीरने शेअर केली आहे. तुमच्याजवळ असलेली अशीच एखादी स्टोरी शेअर करा http://www.bhaskar.com/campaigns/womens-day-special/?lang=1?PROMO-STRIP= या लिंकवर...