आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

3 वर्षांपासून तरुणीशी पोलिसाने ठेवले संबंध; MMS क्लिप शूट करून केले असे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - लग्नाचे आमिष दाखवून 3 वर्षांपासून तरुणीचे शारीरिक शोषण केल्याचे एका प्रकरण समोर आले आहे. गुना येथील रहिवासी तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केली की, एका पोलिस जवानाने तिला लग्नाचे वचन दिले होते. तीन वर्षांपर्यंत प्रेमाचे नाटक करून शारीरिक संबंध बनवले आणि नंतर सोडून गेला. पोलिसांत तक्रार दिली, परंतु रिपोर्ट दाखल होऊनही पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. दररोज तो तिला आणि तिच्या कुटुंबीयांना धमक्या देत आहे. एसपींनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
> पीडिता म्हणाली की, ती गुनाची राहणारी आहे. इंदूरमध्ये राहून परीक्षेची तयारी करत आहे. येथील पोलिस जवानाशी तिचे 3 वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. गावापासूनच आमची ओळख आहे. हळूहळू आमच्यात प्रेम झाले आणि नंतर संबंध प्रस्थापित झाले. जवानानेच तिला इंदूरमध्ये येऊन राहण्यास सांगितले होते. येथे 3 वर्षे त्याने लग्नाचे आमिष देऊन संबंध बनवले. त्याने माझे अनेक MMS क्लिपही बनवल्या. यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार करत राहिला.


> मी जेव्हा त्याला लग्नासाठी म्हटले तेव्हा त्याने धमकी देत मला हाकलून लावले. मी पोलिसांत जाईन म्हणाले तर त्याने माझे अख्खे कुटुंबच पोलिसात आहे, मला कोणी धक्काही लावू शकणार नाही अशी धमकी दिली. तरुणीचा आरोप आहे की, तो रोज धमक्या देत आहे, तो पोलिसांतच असूनही पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही.
- कारवाई होत नसल्याने त्रस्त तरुणीने एसपींचे कार्यालय गाठून तक्रार दिली असता त्यांनी चौकशीचे आदेश दिले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...