आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणीवर बलात्‍कार करून करायला लावले अबॉर्शन, आता दिली अॅसि‍ड हल्‍ल्‍याची धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - आपल्‍यावर एका तरुणाने हॉटेलमध्‍ये बलात्‍कार केला. त्‍यातून दिवस गेल्‍यानंतर त्‍याने गर्भपात करायला लावला. दरम्‍यान, आता तो अॅसिड हल्‍ला करण्‍याची धमकी देत असल्‍याचा आरोप एका 18 वर्षीय तरुणीने केला आहे. पीडित तरुणी ही कॉमन लॉ अंट्रेस टेस्ट (क्लेट) ची तयारी करत आहे. रूपेश जयसवाल असे आरोपीचे नाव आहे.
रेस्त्रांचा मालक आहे आरोपी...
- पीडित तरुणी ही भोपाळच्‍या अरेरा कॉलोनीमध्‍ये राहते. दोन वर्षांपूर्वी एका वाढदिवसाच्‍या कार्यक्रमात आरोपीशी तिची भेट झाली होती.
- आरोपी हा भोपाळच्‍या अशोका गार्डनमध्‍ये राहतो. शिवाय तो शाही हवेली रेस्तरांचा मालक आहे.
- पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्‍या तक्रारीत म्‍हटले, दीड वर्षांपूर्वी आरोपी तिला इंदूरला घेऊन गेला. त्‍याने त्‍या ठिकाणी एका हॉटेलमध्‍ये माझ्यावर बलात्‍कार केला.
- तो इतक्‍यावरच थांबला नाही तर त्‍याने त्रिलंगा एरियामध्‍येही आपल्‍याला बलात्‍कार केला. त्‍यातून दिवस गेल्‍यानंतर त्‍याने गर्भपात घडवून आणला.
दिली अॅसिड फेकण्‍याची धमकी
- मंगळवारी रात्री मुलगी आपल्‍या आईसोबत शॉपिंग करण्‍यासाठी घराबाहेर पडली होती.
- या दरम्‍यान आरोपी रूपेश आणि त्‍याचा मित्र अर्पित सक्सेना पीडित तरुणीजवळ आला.
- सुरुवातीला त्‍यांनी तिला शिविगाळ केली.
- तिने त्‍यांना विरोध केला असता त्‍यांनी तिच्‍या आईलाही अश्‍लील शिव्‍या दिल्‍या.
- शिवाय आरोपीने अॅसीड हल्‍ला करण्‍याची धमकी देऊन पळ काढला, असा आरोप पीडित तरुणीने केला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...