आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 व्या वर्षीच विवाह, 2 लुटारूंवर प्रेम आणि दोनदा खासदारकी, अशी होती फूलनची लाइफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सहकाऱ्यांसोबत फूलन देवी... - Divya Marathi
आपल्या सहकाऱ्यांसोबत फूलन देवी...
भोपाळ - 80 च्या दशकात फूलन देवीचे नाव ऐकताच लोकांचा थरकाप उडायचा. गावा-गावात फूलन देवीचे किस्से ऐकले आणि ऐकवले जात होते. परिस्थितीने फूलनला एवढे कठोर केले होते, की तिने 22 ठाकूरांना एका रांगेत उभे करून ठार मारले होते. त्यावेळी फूलनच्या नावाची सर्वत्र दहशत पसरली होती. फूलन देवीच्या आयुष्यातील असेच काही रोचक प्रसंग...
 

10 व्या वर्षी 40 वर्षाच्या व्यक्तीशी विवाह
- 10 ऑगस्ट 1963 रोजी उत्तर प्रदेशच्या जालोन येथील 'घूरा का पुरवा' गावात फूलन देवीचा जन्म झाला. ती अत्यंत गरीब आणि मागासवर्गातून होती. 
- काकांनी आपली जमीन बळकावल्याचे तिने आपल्या आईकडून ऐकले होते. 
- अवघ्या 10 वर्षांची असताना तिने काका आणि चुलत भावाशी मोठा वाद घातला. काका आणि चुलत भावांच्या विरोधात ती आंदोलनाला बसली होती. त्याचवेळी चुलत भावाने तिच्या डोक्यात विट घातली होती. यावर तिने आपल्यापेक्षा कित्येक वर्षांनी मोठ्या भावाला मारहाण सुद्धा केली. मात्र, विटेच्या जखमेच्या खुना तिच्या माथ्यावर अनेक वर्षे तशाच होत्या.
- 10 वर्षांची असताना तिचा विवाह लावून देण्यात आला. मात्र, काही दिवसांतच फूलन आपल्या पतीच्या अत्याचारांना कंटाळून गावी परतली.
 

दोनवेळा प्रेम, एका प्रियकराचा मृत्यू
- फूलन जेव्हा डाकू बनली तेव्हा गँगचा म्होरक्या बाबू गुज्जर याचे तिच्यावर मन आले. यावरून झालेल्या वादानंतर विक्रम मल्लाह याने बाबू गुज्जरला ठार मारले आणि गँगचा म्होरक्या बनला. तेव्हापासूनच फूलन विक्रमसोबत राहायला लागली.
- 1991 मध्ये माला सेन यांनी लिहिलेल्या India's Bandit Queen: The True Story of Phoolan Devi या पुस्तकात फूलन देवी संदर्भात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. हे किस्से फूलनने स्वतः पुस्तक लिहिताना लेखिकेला सांगितले आहेत. 
- ठाकूरांनी फूलन देवीचे अपहरण करून तिच्यावर 3 आठवड्यांपर्यंत पाश्वी बलात्कार केला असे म्हटले जाते. मात्र, माला सेन यांनी पुस्तक लिहिताना जेव्हा हा प्रसंग विचारला तेव्हा फूलनने तो उघडपणे मांडलेला नाही. फूलन नेहमी एवढेच म्हणाली की ठाकूरांनी माझी खूप थट्टा केली होती. 
- या घटनेनंतर फूलन देवीने आपली टोळी तयार केली. 1981 मध्ये बेहमई गावात परतलेल्या फूलनने सूड घेण्यासाठी 22 ठाकूरांना एका रांगेत उभे केले आणि सर्वांना गोळ्या घालून ठार मारले. 
 

उम्मेद सिंह सोबत विवाह केला तेव्हा...
- फूलन देवी बॅन्डिट क्वीन असताना त्यावेळी भिंडचे पोलिस अधीक्षक राजेंद्र चतुर्वेदी होते. ते फूलनची बाजू सरकारसमोर मांडून चर्चा करत होते. 
- या चर्चेच्या 2 वर्षांनंतर फूलन देवी आत्मसमर्पणास तयार झाली.
- त्यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्या समक्ष फूलन देवीवर 22 खून, 30 दरोडे आणि 18 अपहरणांचे आरोप लावण्यात आले. या प्रकरणी फूलन देवीला 11 वर्षांचा तुरुंगवास झाला. 
- 1994 मध्ये फूलन देवी तुरुंगातून बाहेर पडली आणि उम्मेद सिंहसोबत संसार थाटला.
- 1996 मध्ये फूलन देवी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवली आणि मिर्जापूर येथून खासदार म्हणून निवड झाली. 
- 1998 मध्ये पराभूत झाल्यानंतर 1999 मध्ये पुन्हा खासदारकी मिळवली. 25 जुलै 2001 रोजी शेर सिंह राणा फूलनची भेट घ्यायला आला. 
- यावेळी घराच्या गेटवरून त्याने फूलन देवीवर गोळ्या झाडल्या. आपण ठाकूरांच्या हत्येचा सूड घेतला असे त्याचे म्हणणे होते. 
- 14 ऑगस्ट 2014 रोजी दिल्लीच्या एका न्यायालयाने शेर सिंह राणा याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
बातम्या आणखी आहेत...