आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SUNBURN: मुलींना संरक्षण दिले नाही, पोलिसांनी बंद केली पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - झगमगते लाइट्स, हजारो वॅटचे साउंड, इडीएम आणि ट्रांस म्यूझिकवर थिरकणारे शेकडो तरुण. प्रेक्षकांचा उत्साह देखील डीजेची एनर्जी वाढविणारा होता. हा नजार शनिवारी रात्री भोपाळच्या बिट्टन मार्केट येथील दसरा मैदानावर होता. येथे ब्लॅकआऊट इंटरटेनमेंटच्या वतीने सनबर्नचा प्रसिद्ध डीजे 'एनडीएस अँड ब्ल्यू'च्या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आयोजकांनी खासगी सुरक्षा रक्षकांची अट पूर्ण न केल्यामुळे पोलिसांनी अर्ध्यातच कार्यक्रम बंद पाडला.
सनबर्न फेम सिद्धार्थ आणि गौरव शर्माच्या पॉपुलर डांस नंबर्सवर यंगस्टर्स थिरकत होते. या लाइव्ह कॉन्सर्टचे अँकर प्रतिभा सोन्हिया आणि अमन द रॅपर मशीन हे शानदार सादरीकरण करत होते. जेव्हा स्टेजवर एनडीएस अँड ब्ल्यू दाखल झाले तेव्हा कित्येक तासांपासून त्यांची वाट पाहात असलेल्या तरुणाईच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानंतर मैदानात अभूतपूर्व उत्साह संचारला आणि त्यात तरुणाई मस्ती आणि डांसमध्ये रंगून गेली.
रंगात भंग
यंगस्टर्स जेव्हा डांस आणि मस्तीच्या शिखरावर पोहोचले होते, तेव्हाच स्टेजवर पोलिस दाखल झाले आणि त्यांनी कार्यक्रम गुंडाळण्याचा आदेश दिला. या बद्दल हबीबगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी सुधीर अरजारिया यांनी सांगितले, की आयोजकांनी कार्यक्रमाची परवानगी घेत असताना खासगी सुरक्षा रक्षक तैनात करणार असल्याचे सांगितले होते, मात्र येथे कुठेच सुरक्षा रक्षक दिसत नसल्यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या कारणामुळे आणि कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी वेळे आधी कार्यक्रम बंद करावा लागला.
पुढील स्लाइडमध्ये पाहा PHOTOS.....