आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हापासून अतिबचाव आरोग्यासाठी घातक; व्हिटॅमिन ‘डी’चा अभाव, महिलांवर अधिक परिणाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - उन्हामुळे चेहरा, अंग काळे पडते म्हणून हल्ली उन अंगावर घेण्याचे टाळणे ही जणू फॅशनच झाली आहे. मात्र, या प्रकाराचे दुष्परिणाम आता महिलांवर दिसू लागले आहेत. अशा वृत्तीमुळे महिलांच्या शरिरातील ‘ड’ जीवनसत्वाचे प्रमाण कमी झाले आहे. तज्ज्ञांनुसार मानवी शरीर रोज किमान 20 मिनिटे उन्हाच्या संपर्कात आले पाहिजे.
भोपाळ येथील हमिदिया रुग्णालयात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दीपक मरावी यांच्या मते, मानवी शरिरात ‘व्हिटामिन डी’चे प्रमाण कमी झाले तर हाडांची झीज भरून काढणार्‍या पेशींचे प्रमाण कमी होते. यामुळे शरिरातील हाडे ठिसूळ होऊ लागतात. मान, मणका तसेच गुडघे दुखू लागतात. पाच-सहा महिन्यातच ‘ड’ जीवनसत्व कमी झाल्याचे परिणाम दिसू लागतात. मात्र, यावर उपाय म्हणून रुग्ण पेन किलर घेतात. याचा रुग्णांना काहीही लाभ होत नाही.
‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव
100 रुग्णांत 60 महिला, 40 पुरुषांचा समावेश
कारण काय?
आजच्या जीवनशैलीत माणूस दिवसभर कार, ऑफिस किंवा घरांत एसीमध्ये वावरतो.
घराबाहेर पडले तरी चेहर्‍यासह पूर्ण शरीर झाकून बाहेर पडतो.
उपाय : रोज किमान 20 मिनिटे उन्हामध्ये उभे राहावे.