आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • IAF Embraer Jet Gagandoot Specifications, Sushma Swaraj Flew Pakistan On This Plane

140 कोटी रुपयांच्या प्लेनने पाकिस्तानात गेल्या सुषमा, क्षेपणास्त्रांना करु शकते कन्फ्यूज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय हवाई दलाच्या गगनदूत विमानातून पाकिस्तानला रवाना होताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज. - Divya Marathi
भारतीय हवाई दलाच्या गगनदूत विमानातून पाकिस्तानला रवाना होताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज.
भोपाळ - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हार्ट ऑफ एशिया परिषदेसाठी पाकिस्तानला गेल्या आहेत. मध्य प्रदेशच्या विदिशा येथून विजयी झालेल्या सुषमा स्वराज भारतीय हवाई दलाच्या 'गगनदूत' या विशेष विमानाने पाकिस्तानला गेल्या आहेत. हे विमान क्षेपणास्त्रांनाही चकवू शकते आणि कोणत्याही हवामानात लँड करु शकते. divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे या खास विमानाबद्दल.

क्षेपणास्त्रांनाही चकवा देणारे विमान
हवाई दलाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या विमानात अशी खास यंत्रणा आहे की कितीही मोठी आपत्ती आली तरी त्यातून 'सहीसलामत' बाहेर येऊ शकते.
>> या विमानाची निर्मीती ब्राझीलच्या एंबरर कंपनीने केली आहे. विमानावर क्षेपणास्त्र हल्ला झाला तर विमानातील यंत्रणेत क्षेपणास्त्राला कन्फ्यूज करण्याची क्षमता आहे.
>> जीपीएससोबत मॉडर्न फ्लाइट मॅनेजमेंट सिस्टिम देखिल या विमानात आहे.
>> खराब हवामानात लँडिंगसाठी सेकंड इन्स्ट्रूमेंट लँडिेंग सिस्टिम देखिल विमानात आहे.

विमानाच्या वापरासाठी मंत्र्यांना घ्यावी लागेत PM ची परवानगी
राष्ट्रपती आणि पंतप्रधान देशांतर्गत प्रवासासाठी बिझनेस बोइंग जेटचा वापर करतात तर संरक्षण मंत्री आणि आर्मी चीफ या विमानातून उड्डाण करतात. जर इतर केद्रीय मंत्र्यांना या विमानाची आवश्यकता असेल तर त्यांना पंतप्रधानांची परवानगी घ्यावी लागते.

विमानाची किंमत 140 कोटी रुपये
14 सीटर एंबरर 135 जेटची किंमत जवळपास 140 कोटी रुपये आहे. भारताने असे पाच एंबरर जेट विमान 2005 मध्ये खरेदी केल आहेत. चार बिझनेस जेटचे नाव गगनदूत, वायूदूत, नभदूत आणि मेघदूत आहे. एक बिझनेस जेट सीमा सुरक्षा दलाकडे आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, विमानाचे खास फोटोज्...