आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Swami Swaroopanand Lost His Cool On Question Over Modi

मोदींवरच्या प्रश्नाने दिग्विजयसिंह यांचे गुरु भडकले, पत्रकाराच्या कानशिलात भडकावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- द्वारका पिठाचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती वादात सापडले आहेत. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने त्यांना मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसंदर्भात प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी त्याच्या कानाखाली जाळ काढला. "भाग" असे मोठ्याने ओरडत त्यांनी पत्रकाराला थापड मारली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. परंतु, या घडनेचा व्हिडिओ आता समोर आला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांच्यासह अनेक नेते सरस्वती यांचे शिष्य आहेत.
कोणता होता पत्रकाराचा प्रश्न
जर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर...? या प्रश्नावर सरस्वती यांनी उत्तर न देता पत्रकाराला जोरदार कानाखाली लगावली. फालतू बोलू नकोस. मला राजकारणावर बोलायचे नाही. भाग, असे सरस्वती मोठ्याने ओरडत म्हणाले.
संतांनी केले सरस्वती यांच्या कृतीचे समर्थन
धर्मगुरू प्रमोद कृष्णन म्हणाले, की शंकराचार्यांच्या रागालाही आशिर्वाद मानले पाहिजे. पत्रकार सरस्वती यांच्या चेहऱ्याजवळ आला होता. कुणाला चेहऱ्याजवळ येऊ देऊ नका, असे त्यांना डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी पत्रकाराला दूर केले असेल.
सरस्वती खरेच संत आहेत?
वृत्तवाहिन्यांची संस्था बीईए याचे पदाधिकारी एन. केस. सिंह यांनी घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरस्वती खरेच संत आहेत, की नाही, यावर या घटनेने प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर देशात असे संत आहेत तर ते देशाला कुठे घेऊन जातील?
राजकारणाशी आहे संबंध
सरस्वती यांना राजकारणात रुची आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांना आव्हान देण्यासाठी स्वामी करपात्री महाराजांनी जेव्हा रामराज्य परिषद पार्टी स्थापन केली होती तेव्हा सरस्वती त्याचे अध्यक्ष होते.